रोहा नगरपालिकेच्या विविध समिती सभापतींची निवड बिनविरोध
रोहा नगरपालिकेच्या विविध समिती सभापतींची निवड बिनविरोध
तीन नव्या चेहऱ्यांना संधी; राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)ची एकहाती सत्ता कायम
रोहा, ता. २४ (बातमीदार) : रोहा नगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) यांची एकहाती सत्ता असून नगरपालिकेतील विविध विषय समित्यांच्या सभापती व उपसभापतीपदांसाठी शुक्रवारी झालेल्या निवडणुका बिनविरोध पार पडल्या. या निवडणुकीत चार अनुभवी नगरसेवकांसह तीन नव्या चेहऱ्यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देत पक्षाने अनुभव आणि नवचैतन्य यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे.
नगरपालिकेच्या कारभारात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या समित्यांवर अनुभवी नगरसेवकांची नियुक्ती करताना नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांनाही नेतृत्वाची संधी देण्यात आली आहे. विशेषतः अष्टमी प्रभाग क्रमांक १ आणि प्रभाग क्रमांक २ मधील नगरसेवकांना या निवडीत झुकते माप देण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. पालिकेच्या बांधकाम व अपंग कल्याण समितीच्या सभापतीपदी नगरसेवक राजेंद्र जैन यांची निवड करण्यात आली आहे. पर्यटन, पर्यावरण व नियोजन समितीच्या सभापतीपदी महेश कोल्हटकर, तर पाणीपुरवठा व दिवाबत्ती समितीच्या सभापतीपदी महेंद्र दिवेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. सार्वजनिक आरोग्य व स्वच्छता समितीच्या सभापतीपदी अनुभवी नगरसेवक अहमद दर्जी यांची नियुक्ती करण्यात आली. यासोबतच प्रथमच निवडून आलेले नगरसेवक रवींद्र चाळके यांना शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण समितीचे सभापतीपद देत पक्षाने त्यांच्यावर विश्वास टाकला आहे. तसेच महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी निता हजारे, तर उपसभापतीपदी गौरी बारटक्के यांची बिनविरोध निवड झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

