खोपोली नगरपरिषदेत सर्व समित्यांवर एकमताने निर्णय

खोपोली नगरपरिषदेत सर्व समित्यांवर एकमताने निर्णय

Published on

खोपोली नगरपरिषदेत सर्व समित्यांवर एकमताने निर्णय
खालापूर, ता. २४ (बातमीदार) : खोपोली नगरपरिषदेमधील विविध विषय समित्यांच्या सभापतींची निवड प्रक्रिया मंगळवारी बिनविरोध पार पडली. नगरपरिषद सभागृहात झालेल्या या निवड बैठकीस नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे, उपनगराध्यक्ष विक्रम साबळे तसेच मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील उपस्थित होते. सर्व पक्षांच्या सहमतीने आणि शांततेत ही निवड प्रक्रिया पार पडल्याने नगरपरिषदेच्या प्रशासनाला आगामी काळात अधिक गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
नगरपरिषदेच्या नियमानुसार उपनगराध्यक्ष हे पाणीपुरवठा समितीचे पदसिद्ध सभापती असतात. त्यानुसार उपनगराध्यक्ष विक्रम साबळे यांची पाणीपुरवठा समितीच्या सभापतीपदी निवड झाली आहे. शहरातील पाणीटंचाई, पाणीपुरवठ्याचे नियोजन आणि पायाभूत सुविधा सुधारण्याच्या दृष्टीने ही समिती महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. आरोग्य समितीच्या सभापतीपदी मयुरी शेलार यांची, तर परिवहन समितीच्या सभापतीपदी किशोर पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. शिक्षण समितीच्या सभापतीपदी अमित फाळे, बांधकाम समितीच्या सभापतीपदी अनिल सानप, महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी सुवर्णा मोरे, तर नियोजन समितीच्या सभापतीपदी प्रतीक्षा रेटरेकर यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे नगरपरिषदेच्या सर्व महत्त्वाच्या विषय समित्यांचे नेतृत्व निश्चित झाले असून शहरातील विकासकामे, नागरी सुविधा, आरोग्य, शिक्षण आणि महिलांसाठीच्या योजनांना चालना मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com