प्रजासत्ताक दिनानिमित्त अर्थार्जनाचा मार्ग
प्रजासत्ताक दिनानिमित्त बाजारपेठ तिरंगामय
वसई, ता. २४ (बातमीदार): देशाचा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यासाठी वसई तालुका सज्ज झाला असून बाजारपेठांमध्ये खरेदीला उधाण आले आहे. ''वंदे मातरम'' आणि ''भारत माता की जय''च्या घोषात तिरंग्याचा मान राखण्यासाठी नागरिक सज्ज झाले असून, या निमित्ताने तालुक्यातील छोट्या-मोठ्या व्यावसायिकांसाठी अर्थार्जनाचा नवा मार्ग खुला झाला आहे.
वसई, विरार आणि नालासोपारा शहरातील दुकाने देशप्रेमाच्या रंगात न्हाऊन निघाली आहेत. बाजारात विविध प्रकारचे साहित्य उपलब्ध झाले असून नागरिक मोठ्या उत्साहाने खरेदी करत आहेत. यामध्ये तिरंगी जॅकेट, सदरा, साडी, टोपी, पूर्ण पोशाख, बॅच आणि विविध आकारांचे झेंडे यांचे प्रमुख आकर्षण आहे. लहान मुलांचे तिरंगी कपडे ३०० रुपयांपासून उपलब्ध आहेत, तर मोठ्यांचे कपडे ५०० रुपयांच्या पुढे विक्री होत आहेत. रस्त्याच्या कडेला झेंडे, वाहनांचे स्टिकर्स आणि बॅच विकणाऱ्या फिरत्या विक्रेत्यांनाही या निमित्ताने चांगला रोजगार मिळाला आहे.
शासकीय कार्यालयांत जय्यत तयारी
२६ जानेवारी रोजी वसई तहसील कार्यालय, वसई-विरार महानगरपालिका, पोलीस ठाणी, विविध ग्रामपंचायती आणि शासकीय-निमशासकीय कार्यालयांमध्ये ध्वजारोहणाचे कार्यक्रम पार पडणार आहेत. अनेक गृहनिर्माण संस्था आणि सामाजिक संस्थांनीही सांस्कृतिक उपक्रम व सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले आहे.
पोलिस बंदोबस्त तैनात
प्रजासत्ताक दिनानिमित्त होणारी गर्दी आणि सुरक्षितता लक्षात घेता, वसई तालुक्यात पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला आहे. कुठेही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी मिरा-भाईंदर वसई-विरार पोलिस आयुक्तालयामार्फत गस्त वाढवण्यात आली आहे.
फोटो ओळ : तिरंग्याची सजावट असलेली दुकाने सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत असून, यंदा खरेदीचा कल वाढल्याचे चित्र दिसत आहे."
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

