निसर्गाचे पुस्तक विद्यार्थ्यांनी डोळसपणे वाचावे

निसर्गाचे पुस्तक विद्यार्थ्यांनी डोळसपणे वाचावे

Published on

निसर्गाचे पुस्तक विद्यार्थ्यांनी डोळसपणे वाचावे
प्राचार्य डॉ. सोमनाथ विभुते यांचे प्रतिपादन
वसई, ता. २४ (बातमीदार) : वसंत पंचमीच्या निमित्ताने विद्यारंभाची परंपरा असून, विद्यार्थ्यांनी दररोज काहीतरी नवे ज्ञान आत्मसात केले पाहिजे. निसर्गाकडून शिकण्यासारखे खूप काही आहे. निसर्ग हे एक उघडे पुस्तक असून विद्यार्थ्यांनी ते अत्यंत डोळसपणे वाचले पाहिजे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. सोमनाथ विभुते यांनी वसई येथे विद्यार्थ्यांना उद्देशून केले.
अखिल भारतीय साहित्य परिषद, पालघर जिल्हा आणि संत गोन्सालो गार्सिया महाविद्यालय, वसई येथील हिंदी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वसंत पंचमी व थोर स्वातंत्र्यसैनिक नेताजी सुभाष चंद्र बोस जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ. सोमनाथ विभुते उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात माता सरस्वती वंदनेने करण्यात आली. यानंतर माता सरस्वती व नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात डॉ. विभुते यांनी वसंत पंचमीचे शैक्षणिक व सांस्कृतिक महत्त्व विशद केले. विद्यार्थ्यांनी ज्ञानार्जनासोबतच मूल्यशिक्षणाकडेही लक्ष दिले पाहिजे, असे सांगत त्यांनी नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात नेताजींचे योगदान, त्यांची धाडसी नेतृत्वशैली आणि देशप्रेम यांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांचाही उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. अश्विता मेहेर आणि पिंकी गुप्ता या विद्यार्थिनींनी नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जीवनावर आपले विचार प्रभावीपणे मांडले. श्रावणी सुळे या विद्यार्थिनीने वसंत पंचमीचे महत्त्व स्पष्ट करीत कविता सादर केली. तसेच मनीषा यादव हिने राष्ट्रकवी मैथिलीशरण गुप्त यांची ‘दोनों ओर प्रेम पलता है’ ही कविता सादर करून रसिकांची दाद मिळवली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com