रस्ता सुरक्षेसाठी प्रभात फेरी
रस्ता सुरक्षेसाठी प्रभातफेरी
तुर्भे, ता. २४ (बातमीदार) : वाशी येथे रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत शुक्रवारी (ता. २३) वाशी वाहतूक पोलिस विभागाच्या वतीने प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले. नवी मुंबई वाहतूक पोलिसांकडून रस्ता सुरक्षेबाबत जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविले जात असून, त्याचाच एक भाग म्हणून वाशीतील सेंट मेरी शाळेच्या सहकार्याने आरएसपी विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढण्यात आली.
या प्रभातफेरीत सुमारे २५० ते ३०० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत, हेल्मेट व सीट बेल्टचा वापर करावा तसेच वेगमर्यादेचे पालन करावे, याबाबत विद्यार्थ्यांनी घोषणांद्वारे जनजागृती केली. प्रभातफेरी सेंट मेरी शाळा, सेक्टर १० येथून सुरू होऊन शबरी हॉटेल, फायर ब्रिगेड चौक आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे समाप्त झाली.
या वेळी शाळेचे विद्यार्थी व शिक्षकांनी वाहनचालकांना गुलाबाचे फूल देत वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन केले. कार्यक्रमास पोलीस उपनिरीक्षक वाजे, पोलीस हवालदार महेश पाटील, पोलिस नाईक चव्हाण यांच्यासह वाहतूक पोलीस कर्मचारी उपस्थित होते. या उपक्रमामुळे रस्ता सुरक्षेबाबत सकारात्मक संदेश पोहोचल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

