युवकांसाठी करिअर संवाद

युवकांसाठी करिअर संवाद

Published on

युवकांसाठी करिअर संवाद
वाशी, ता. २४ (बातमीदार) : मराठी भाषेची अभिजातता जपण्यासाठी सोपे शब्द, सुटसुटीत वाक्यरचना, बिनचूक मांडणी, मोजकी शब्दरचना आणि स्पष्ट विचार आवश्यक असल्याचे मत सुप्रसिद्ध लेखक तथा माहिती व जनसंपर्क संचालनालयाचे निवृत्त संचालक सुरेश वांदिले यांनी व्यक्त केले. नवी मुंबई महापालिकेच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात आयोजित कार्यालयीन मराठी लेखन व मराठी युवकांसाठी करिअरच्या संधी या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते.
या वेळी अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांच्या हस्ते वांदिले यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास प्रशासन विभागाचे उपआयुक्त किसनराव पलांडे, अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त डॉ. कैलास गायकवाड, परिमंडळ २चे उपआयुक्त संजय शिंदे, मुख्य विधी अधिकारी अभय जाधव, कार्यकारी अभियंता प्रवीण गाडे, सहाय्यक आयुक्त अरुण पाटील यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, नागरिक व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वांदिले यांनी वाचनसंस्कृतीवर भर देताना किमान वर्तमानपत्रातील संपादकीय नियमित वाचण्याचा सल्ला दिला. तसेच केंद्र सरकारच्या ‘भाषिणी’ अ‍ॅपमध्ये मराठीसह २२ भारतीय भाषांचा समावेश असल्याची माहिती त्यांनी दिली.
चौकट
करिअरसाठी चौकटीबाहेर विचार गरजेचा
मराठी युवक व पालक इंजिनिअरिंग व मेडिकल या पारंपरिक क्षेत्रांपुरतेच करिअरचे पर्याय मर्यादित ठेवतात, याबाबत खंत व्यक्त करीत वांदिले यांनी पर्यटन, सागरी वाहतूक, हॉटेल मॅनेजमेंट, डिझायनिंग, विमानतळ व्यवस्थापन, क्रीडा व्यवस्थापन यांसारख्या व्यवसायाभिमुख क्षेत्रांत मोठ्या संधी उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले. आगामी काळात योग प्रशिक्षण, इव्हेंट मॅनेजमेंट, वेडिंग प्लॅनर, मानसोपचार व सायबरतज्ज्ञ या क्षेत्रांत रोजगाराच्या संधी वाढणार असून, मराठी तरुणांनी आत्मविश्वासाने या संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com