भिवंडीत विवाहितेवर घरगुती हिंसाचार

भिवंडीत विवाहितेवर घरगुती हिंसाचार

Published on

भिवंडी, ता. २४ (बातमीदार) : भिवंडीत घडलेल्या घरगुती हिंसाचाराच्या एका गंभीर घटनेमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. निजामपुरा पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनुसार, विवाहित महिलेवर सासरच्या कुटुंबीयांनी मानसिक छळ करत तिला घराबाहेर काढले आहे. याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पीडित महिला सध्या भिवंडीतील बाजारपेठ परिसरात राहत असून, तिचे सासर डोंबिवली येथील रूनवाल गार्डन परिसरात आहे. सासरी असताना तिला सातत्याने शारीरिक व मानसिक त्रास देण्यात येत होता. ‘तू अपशकुनी आहेस’ असे म्हणत दर अमावास्येला मानसिक छळ केला जात असल्याचा आरोप तिने केला आहे. पीडित महिलेला कर्करोगाची लागण झाली असून, हा आजार चौथ्या टप्प्यापर्यंत गेला आहे. तक्रारीनुसार, पती व सासरच्या मंडळींनी कोणताही औषधोपचार न करता तिला मारहाण केली व तिच्या लहान मुलासह घराबाहेर काढले. याप्रकरणी पीडित महिलेने पती योगेशकुमार केशरवाणी, सासरा ओंकारनाथ केशरवाणी, सासू चंद्रावती केशरवाणी, तसेच नणंद अनुराधा व श्रद्धा यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. निजामपुरा पोलिस ठाण्यात पोलिसांनी तक्रारीची दखल घेत सहा जणांविरोधात गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com