केंद्र प्रमुखांच्या परीक्षेत निवडणुकीचे विघ्न

केंद्र प्रमुखांच्या परीक्षेत निवडणुकीचे विघ्न

Published on

केंद्रप्रमुखांच्या परीक्षेत निवडणुकीचे विघ्न
अचानक तारखा जाहीर केल्याने शिक्षकांसमोर अडचणी

मुंबई, ता. २४ : राज्यातील सरकारी, अनुदानित शाळांतील वरिष्ठ शिक्षकांसाठी घेण्यात येणारी समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्रप्रमुख) विभागीय परीक्षा ही ३ आणि ४ फेब्रुवारीला आयोजित केली जाणार आहे; मात्र याच कालावधीत राज्यातील जिल्हा परिषदांच्य‍ा निवडणुकांची रणधुमाळी आणि ५ फेब्रुवारीला मतदान होत असल्याने केंद्रप्रमुखांच्या परीक्षेची तयार करणाऱ्या शिक्षकांपुढे पेच निर्माण झाला आहे.
गेल्या अनेक वर्षांनंतरच्या प्रतीक्षेनंतर समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्रप्रमुख) विभागीय परीक्षा ही राज्यात होत आहे. यासाठी शिक्षकांकडून तयारीही करण्यात आली असून शालेय शिक्षण विभागाकडून या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करीत या परीक्षा ३ आणि ४ तारखेला आयोजित केल्या आहेत. याच दरम्यान राज्यात ५ तारखेला जिल्हा परिषदेसाठी मतदान होणार असून यामध्ये ज्या शिक्षकांना निवडणुकांचे कामे सोपविण्यात आली आहेत, ते शिक्षक या परीक्षेला मुकण्याची भीती व्यक्त होत आहे. तर दुसरीकडे ज्या शिक्षकांना दहावी-बारावीच्या परीक्षांची तयारी आदींची कामे देण्यात आली आहेत, तसेच आपल्या गावी अथवा इतर ठिकाणी मतदान असल्यास त्यांना ४ तारखेच्या परीक्षेला बसणे अवघड होणार आहे. तसेच काही शिक्षक हे पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूक कामासाठी गेल्या काही दिवसांपासून तहसील कार्यालयामध्ये निवडणूक कामांसाठी वर्ग झाले आहेत, त्यामुळे त्यांनाही ही परीक्षा देणे शक्य होणार नाही.

तारीख बदलण्याची मागणी
केंद्रप्रमुख परीक्षेसाठी अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच परीक्षा होत आहे, या निर्णयाचे स्वागत आहे; परंतु दोन-तीन वेळा रद्द झालेल्या या परीक्षेची तारीख अचानक जाहीर करणे उमेदवारांच्या दृष्टीने योग्य नसल्याचे परीक्षार्थी व प्राथमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष नितीन मेमाणे यांनी सांगितले. यासाठी शालेय शिक्षण विभागाने तारखांच्या बदलांसाठी पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com