पावणे एमआयडीसीत आगीत ८ कंपन्या खाक

पावणे एमआयडीसीत आगीत ८ कंपन्या खाक

Published on

पावणे एमआयडीसीच्या आगीत आठ कंपन्या खाक
पाच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात
नवी मुंबई, तुर्भे, ता. २४ (वार्ताहर) ः पावणे एमआयडीसीतील बिटाकेम या रासायनिक कंपनीत आग लागली. बिटाकेमसह त्याच्या आजूबाजूच्या एकूण आठ कंपन्या खाक झाल्याची दुर्घटना शनिवारी दुपारी घडली. सुदैवाने या आगीत जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर येथील आग आटोक्यात आणली. त्यानंतर सायंकाळी कूलिंगचे काम सुरू होते. या आगीच्या भक्षस्थानी पडलेल्या आठही कंपन्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही आग रासायनिक टँकरमुळे लागल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
पावणे एमआयडीसीतील बिटाकेम कंपनीमध्ये दुपारी आग लागली. त्यानंतर या कंपनीतून मोठ्या प्रमाणात काळ्या धुराचे लोट दूरवर पसरले. या कंपनीतील कर्मचारी वेळीच बाहेर पडल्याने ते बचावले. या आगीची माहिती मिळताच एमआयडीसी अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र कंपनीत मोठ्या प्रमाणात रसायन असल्याने काही वेळातच ही आग आजूबाजूला पसरली. आगीची व्याप्ती मोठी असल्याने वाशी, कोपरखैरणे आणि नेरूळ येथील महापालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. आग आजूबाजूच्या कंपन्यांमध्ये पसरल्याने तेथील कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी पाच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर सायंकाळी आग आटोक्यात आणली. त्यानंतर सायंकाळी उशिरापर्यंत कूलिंगचे काम सुरू करण्यात आले. या आगीमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले, तरी बिटाकेम कंपनीमध्ये उभ्या असलेल्या केमिकलच्या टँकरला प्रथम आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. तुर्भे पोलिस ठाण्यात या आगीची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com