लहान मुलांना का मारते या रागाच्या भरातून जन्मदात्या आईने केली सर्वात मोठ्या मुलीची हत्या

लहान मुलांना का मारते या रागाच्या भरातून जन्मदात्या आईने केली सर्वात मोठ्या मुलीची हत्या

Published on

आईने केली मुलीची हत्या
नालासोपारा, ता. २४ ( बातमीदार) ः लहान मुलांना का मारते, अशी विचारना केली एवढ्या किरकोळ कारणावरून जन्मदात्या आईनेच आपल्या १५ वर्षांच्या मुलीच्या डोक्यात दगडी पाटा घालून निर्घृणपणे हत्या केली. नालासोपारा पूर्व संतोष भुवन परिसरात विद्या विकास मंडळ चाळ, टांडा पाडा या ठिकाणी शनिवारी (ता. २४) ही घटना घडली. याबाबत तुळिंज पोलिस ठाण्यात आईविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली आहे.
कुमकुम प्रजापती असे आईचे नाव असून, अंबिका असे हत्या झालेल्या १५ वर्षांच्या मुलीचे नाव आहे. नालासोपारा पूर्व संतोष भुवन परिसरात विद्या विकास मंडळ चाळ, टांडा पाडा या ठिकाणी प्रजापती हे कुटुंब राहत आहे. यांना तीन मुली आणि दोन मुले आहेत. यातील हत्या झालेली अंबिका ही मोठी मुलगी होती. आई गृहिणी तर वडील बिगारी काम करतात. घरातील मोठी मुलगी असल्याने अंबिका आपल्या छोट्या भावंडांना काही चूक झाली तर मोठी बहीण या नात्याने मारहाण करीत होती. त्याचा राग मनात धरून आईनेच आपल्या १५ वर्षांच्या मुलीच्या डोक्यात घरातील दगडी पाटा घातला. यात तिच्या डोक्याला गंभीर इजा होऊन ती जागीच गतप्राण झाली. ही बातमी तुळिंज पोलिसांना कळताच सहाय्यक पोलिस आयुक्त उमेश माने पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय जाधव यांच्यासह गुन्हे प्रकटीकरण टीमने घटनास्थळावर जाऊन चौकशी केली असता, आईनेच किरकोळ कारणावरून ही हत्या केल्याचे उघड झाले आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून आईला पोलिसांनी ताब्यात घेतले. तुळिंज पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून आईला अटक केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com