चिखलातून पायपीटची वेळ

चिखलातून पायपीटची वेळ

Published on

चिखलातून पायपीटची वेळ
सरावलीच्या अवधनगरचे नागरिक त्रस्त
बोईसर, ता.२४(वार्ताहर) : सरावली ग्रामपंचायत हद्दीतील अवधनगर येथील चेतना गल्लीत सतत वाहनाऱ्या पाण्यामुळे चिखल साचला आहे. या पाण्यातूनच स्थानिकांना पायपीट करावी लागत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.
तारापूर औद्योगिक क्षेत्रातून ड्रम येथे धुतले जात असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रक्रियेतून बाहेर पडणारे पाणी थेट रस्त्यावर वाहत असल्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. सतत पाणी वाहत राहिल्यामुळे चेतना गल्लीतील मुख्य रस्त्यावर चिखल झाला आहे. तर दुसरीकडे दुर्गंधीमुळे रहिवासी त्रस्त आहेत. त्यामुळे सरावली ग्रामपंचायतीने तातडीने लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
---------------------------------
भंगाराच्या गोदामातील ड्रम धुतले जात असल्यामुळे पाणी रस्त्यावर सोडले जात असल्याची शंका आहे. रस्ता कायम ओला राहिल्याने दुचाकी घसरून अपघात होण्याची भीती आहे. तसेच दुर्गंधीमुळे घरात राहणे कठीण झाले आहे.
ः- हेमंत साळुंखे, तक्रारदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com