पान ३ पट्टा
शिवणकला प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन
विक्रमगड (बातमीदार)ः सत्यसाई सेवा संस्था, मुंबई जिल्हा क्रमांक १ यांच्या सौजन्याने ओंदे येथे गरजू महिलांसाठी मोफत शिवणकला प्रशिक्षण केंद्राचे उद्घघाटन उत्साहात पार पडले. या उपक्रमात १५० महिलांनी सहभाग घेतला. या प्रशिक्षण केंद्रामुळे स्थानिक महिलांना शिवणकलेचे कौशल्य आत्मसात करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. जानेवारी २०२६ च्या पहिल्या आठवड्यात डहाणू, विक्रमगड आणि जव्हार तालुक्यात मिळून ५,४०० गोधडींचे वाटप करण्यात आले. गेल्या ८ ते १० वर्षांपासून संस्था विविध सेवाभावी उपक्रम राबवत असल्याचेही त्यांनी नमूद केले. याप्रसंगी ओंदे ग्रामपंचायत सदस्य, संस्थेचे मुंबई येथील पदाधिकारी, विक्रमगड तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
़़़़ः------------------------------------
सार्वजनिक शौचालयाअभावी महिलांची कुचंबणा
वाडा (बातमीदार)ः कुडूस गावात महिलांसाठी स्वतंत्र, सुसज्ज सार्वजनिक शौचालयाची तीव्र गरज निर्माण झाली आहे. या मूलभूत सुविधेअभावी महिलांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. बाजारपेठ, बसथांबा, बँका, शासकीय कार्यालये, आठवडी बाजार तसेच शाळ-विद्यालयांच्या परिसरात महिलांसाठी स्वच्छ व सुरक्षित शौचालयाची कोणतीही सोय नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. कुडूस वाडा तालुक्यातील व्यापारी केंद्र असून दररोज ग्रामीण भागातील महिला विविध कामांसाठी येथे ये-जा करतात. मात्र, सार्वजनिक शौचालय नसल्याने महिलांना असुविधाजनक परिस्थिती सहन करावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत व संबंधित प्रशासनाने तातडीने लक्ष घालून महिलांसाठी स्वतंत्र, सुरक्षित, पाण्याची, स्वच्छतेची सोय असलेले सार्वजनिक शौचालय उभारावे, अशी जोरदार मागणी महिलावर्गातून होत आहे.
ः-------------------------------------
नागझरी-चरी खुर्द ग्रामपंचायत वादात
बोईसर (वार्ताहर) ः नागझरी–चरी खुर्द ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचारप्रकरणी प्रशासनाने सात महिने उलटूनही कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. या निषेधार्थ नागझरीचे ग्रामस्थ सिद्धेश पाटील पालघर जिल्हा परिषद कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करणार आहेत. उपसरपंचांनी ग्रामसेवक शिवाजी धनासुरे, सरपंच कविता भुरकुड यांच्याविरोधात एप्रिल २०२५ मध्ये पदाचा गैरवापर, आर्थिक अनियमिततेबाबत तक्रार केली होती. मात्र, हमी देऊनही त्यानंतर निधींचा गैरवापर, बनावट कागदपत्रे, अपूर्ण इतिवृत्ते, लेखापरीक्षण तसेच कर वसुली बँकेत जमा केले नसल्याचा आरोप होत आहेत. या प्रकरणात ग्रामविस्तार अधिकारी राजु कोळी, लेखापरीक्षक जावेद शेख यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त करण्यात आला आहे. संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर फौजदारी कारवाई करावी तसेच चौकशीपूर्वी ग्रामपंचायतीचे दप्तर ताब्यात घ्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
ः-------------------------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

