पराभूत उमेदवाराचे प्रजासत्ताक दिनी उपोषण

पराभूत उमेदवाराचे प्रजासत्ताक दिनी उपोषण

Published on

प्रजासत्ताकदिनी पराभूत उमेदवाराचे उपोषण
निवडणूक प्रक्रियेत घोळ असल्याचा आरोप
ठाणे, ता. २५ : ठाणे महानगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत मतदान यंत्रणा आणि प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा खळबळजनक आरोप करण्यात येत आहे. या कथित घोळाच्या निषेधार्थ आणि फेरनिवडणुकीच्या मागणीसाठी प्रभाग क्रमांक १५ मधील अपक्ष उमेदवार रवींद्र चांगो शिंदे यांनी प्रजासत्ताकदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
रवींद्र शिंदे यांच्या दाव्यानुसार, निवडणूक प्रक्रियेत वापरण्यात आलेली यंत्रणा सदोष होती. प्रत्यक्ष झालेले मतदान आणि मतमोजणीच्या आकड्यांमध्ये तफावत असल्याचा दावा शिंदे यांनी केला आहे. यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाकडे पत्रव्यवहार करूनही अद्याप कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. संपूर्ण निवडणूक प्रक्रियेची निवृत्त न्यायाधीशांमार्फत सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेद्वारे निवडणूक घ्यावी किंवा व्हीव्हीपॅट सुविधा अनिवार्य करावी. सध्याची प्रभागरचना किंवा पॅनेल पद्धत असंविधानिक असून, ती रद्द करण्याची मागणी केली आहे. तसेच ज्या ठिकाणी उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे बिनविरोध निवडणुका झाल्या, त्या प्रकरणांची सखोल चौकशी व्हावी, अशा त्यांच्या मागण्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com