मेट्रो स्थानकाच्या नावावरून वादंग
मेट्रो स्थानकाच्या नावावरून वादंग
‘पांडुरंगवाडी’ऐवजी ‘पेणकर पाडा’ देण्याची मागणी
भाईंदर, ता. २५ (बातमीदार) : मिरा-भाईंदर शहराच्या प्रवेशद्वारावर असलेल्या मेट्रोच्या स्थानकाला एमएमआरडीएकडून पांडुरंगवाडी असे नाव दिले आहे. मात्र, या स्थानकाला पेणकर पाडा नाव देण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. त्यामुळे मेट्रो सुरू होण्यापूर्वीच वाद सुरू झाला आहे.
मिरा-भाईंदरच्या मेट्रोचा पहिला टप्पा सुरू होणार आहे. दहिसरहून मिरा-भाईंदरमध्ये येणाऱ्या मेट्रो ९ च्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. येत्या काही दिवसात टप्प्याचे लोकार्पण होऊन दहिसर ते काशी मिरा मार्गावर मेट्रो धावू लागणार आहे. या मार्गावरील मिरा-भाईंदर हद्दीत असलेल्या पहिल्या मेट्रो स्थानकाला पांडुरंगवाडी नाव देण्यात आले आहे. मात्र, भौगोलिक वास्तवाशी नाव पूर्णतः विसंगत असल्याचा आक्षेप स्थानिकांनी घेतला आहे.
मिरा-भाईंदर हद्दीतील पहिले गाव असलेल्या पेणकर पाडा या ठिकाणी आहे. असे असताना एमएमआरडीएने गावाचे नाव डावलून सुमारे ८०० मीटरपेक्षा अधिक दूर अंतरावर असलेल्या पांडुरंगवाडी परिसराचे नाव स्थानकाला दिले आहे, ही बाब भावना दुखावणारी आहे.
-----------------------------
स्थानिकांचे आक्षेप
- मिरा-भाईंदरमधील पेणकर पाडा गाव ऐतिहासिक गाव आहे. गेल्या शंभर वर्षांहून अधिक काळ विविध समाजातील नागरिक या ठिकाणी वास्तव्यास आहेत. या गावाची स्वतंत्र ओळख, इतिहास, अस्तित्व असूनही जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.
- ‘पांडुरंगवाडी’ या नावाला स्थानिकांचा विरोध नाही. मात्र, ज्या ठिकाणी मेट्रो स्थानक प्रत्यक्षात अस्तित्वात आहे, त्या ठिकाणाच्या नावाने स्थानक ओळखले पाहिजे. त्यामुळे मेट्रो स्थानकाचे नाव बदलण्याची मागणी स्थानिकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, एमएमआरडीए आयुक्तांकडे केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

