भिवंडीत सुंदरकांडाचे पठण, भजन संध्या

भिवंडीत सुंदरकांडाचे पठण, भजन संध्या

Published on

भिवंडी, ता. २५ (बातमीदार) : अयोध्येतील भगवान श्रीराम यांच्या भव्य मंदिराच्या उद्‍घाटन वर्धापन दिनानिमित्त भिवंडी येथील श्री सिद्धेश्वर योग मित्र मंडळाच्या वतीने अशोकनगर परिसरातील श्री सिद्धेश्वर महादेव मंदिरात सुंदरकांडाचे पठण व भक्तिमय भजन संध्या घेण्यात आली. या धार्मिक कार्यक्रमाला परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत भक्तिभाव व्यक्त केला. याप्रसंगी योगगुरू व भजन गायक श्यामनाथ शर्मा; तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी सुंदरकांडाचे भावपूर्ण पठण आणि भक्तिरसाने परिपूर्ण भजने सादर केली. त्यांच्या सादरीकरणामुळे संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला. सुंदरकांड व भजन ऐकण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
योगगुरू श्यामनाथ शर्मा यांनी सांगितले की, गेल्या वर्षापासून अशोकनगर येथील श्री सिद्धेश्वर महादेव मंदिरात दररोज सकाळी ६.४५ ते ७.४५ या वेळेत कोणत्याही सुट्टीशिवाय योगसाधना केली जाते. या उपक्रमाच्या माध्यमातून आरोग्याबरोबरच सकारात्मक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात येतो. या योग उपक्रमात दररोज मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होत असल्याचे त्यांनी नमूद केले. सुंदरकांड व भजन संध्येचा कार्यक्रमसाठी योग मित्र मंडळाचे सदस्य बनवारीलाल केसरवाणी, शीतलप्रसाद मिश्रा, सुधीर देशमुख, शीतल देशमुख, घनश्याम केसरवाणी, रामनारायण सोनी, राजूभाई मौर्य, बळवंत वाणी, सुरेश गुप्ता, मिलिंद गुप्ता, मनसे पलटवडे तसेच अनिल यादव यांनी विशेष परिश्रम घेतले. याशिवाय दीपक रामचंदानी, प्रमोद अग्रवाल, कांतीभाई सावला, संतोष गुप्ता व इतर सदस्यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. भाविकांनी प्रसादाचा लाभ घेत कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com