ठाणे थोडक्यात

ठाणे थोडक्यात

Published on

लोकल प्रवासात घड्याळाची चोरी
ठाणे: डोंबिवलीतून ठाण्याकडे येणाऱ्या लोकलमधून प्रवास करणाऱ्या डोंबिवलीतील अविचल दुबे (३२) या महिलेच्या हातातील घड्याळ चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. ही घटना गुरूवारी (ता. २२) दिवा ते ठाणे रेल्वे स्थानकादरम्यान घडली. प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत अनोळखी महिलेने तक्रारदार महिलेच्या हातातील १७ हजार रुपये किमतीचे ऑटोमॅटिक घड्याळ चोरीला गेल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. याप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पुढील तपास सुरू आहे.
............

झाडाने पथदिवे खांबांचे नुकसान
ठाणे : पांचपाखाडी, भक्ती मंदिराजवळील वर्षा सोसायटी या ठिकाणी एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या आवारातील झाड रस्त्यावर पडल्याची घडली शनिवारी रात्री घडली. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसली तरी, त्यामुळे स्ट्रीट लाईट पोल पडून नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती नगरसेवक संजय वाघुले यांनी ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षेला दिली. तर रस्त्यावर पडलेले झाड अग्निशमन दलाचे जवान व आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांकडून कापून बाजूला केले असून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला. या घटनेत झाड पडल्याने बांधकाम बाधीत इमारतीचे संरक्षण भिंतीचे लोखंडी पत्रे व रस्त्यावरील स्ट्रीट लाईट पोल पडून नुकसान झाले आहे. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षेने दिले.
.........

दिव्यातील तरुणाचा मोबाईल चोरीला
ठाणे: ठाणे रेल्वे स्थानकावर लोकलमधील गर्दीचा फायदा घेत, चोरट्याने दिवा पूर्व येथे राहणारे वैष्णव कमलाकर जाधव (२४) या तरुण प्रवाशाचा महागडा मोबाईल फोन चोरल्याची घटना घडली आहे. वैष्णव हा जुईनगरहून ठाण्याकडे लोकलने प्रवास करत असताना डाउन आसनगाव स्लो लोकलच्या जनरल डब्यात चढला. गर्दीत त्यांच्या जॅकेटच्या खिशातील ५७ हजार ८०० रुपये किंमतीचा मोबाईल चोरीस गेला. याप्रकरणी ठाणे रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
............

घोडबंदर रोड आनंदनगरातून रिक्षाची चोरी
ठाणे: ठाण्यातील आनंदनगर परिसरातून चोरट्याने ऑटो रिक्षा चोरी केल्याची घटना समोर आली आहे. घोडबंदर रोड, आनंदनगर येथील हरीशचंद्र माने (२७), हे टेम्पो चालक म्हणून कार्यरत असून त्यांनी आपली रिक्षा नेहमीप्रमाणे आनंदनगर येथे पार्क केली होती. मात्र सायंकाळी रिक्षा त्या ठिकाणी आढळून आली नाही. परिसरात शोध घेऊनही रिक्षा न मिळाल्याने चोरी झाल्याची खात्री झाली. सुमारे ७० हजार रुपये किमतीच्या रिक्षा चोरीप्रकरणी कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com