यंदा ध्वजवंदनाचा मान संचिताला
मुरबाड, ता. २५ (वार्ताहर) : राज्यात प्रथमच ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील भादाणे गावाने शिक्षण क्षेत्रात एक अभिनव व प्रेरणादायी पाऊल उचलले आहे. हा उपक्रम आज ‘भादाणे पॅटर्न’ म्हणून ओळखला जात आहे. या उपक्रमाअंतर्गत आतापर्यंत २१ विद्यार्थ्यांना ध्वजारोहणाचा मान मिळाला आहे. यावर्षी संचिता राजेंद्र यशवंतराव या विद्यार्थिनीने बारावी विज्ञान शाखेच्या परीक्षेत ७७ टक्के गुण मिळवून भादाणे गावातून प्रथम क्रमांक पटकावला. त्यामुळे भादाणे जिल्हा परिषद शाळेच्या यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनाचा ध्वजवंदनाचा मान तिला आई-वडिलांसह देण्यात आला.
भादाणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत १५ ऑगस्ट २०१५ ला तत्कालीन सरपंच तथा शाळा शिक्षण समितीचे अध्यक्ष संजय हांडोरे पाटील यांनी एक क्रांतिकारी निर्णय घेतला. या निर्णयानुसार स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहणाचा मान दहावी व बारावीमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या निवासी व अनिवासी विद्यार्थ्यांना त्यांच्या आई-वडिलांसह देण्यात येऊ लागला. ध्वजारोहणाचा सन्मान थेट शैक्षणिक गुणवत्तेशी जोडल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाविषयी उत्साह निर्माण झाला असून शैक्षणिक गुणवत्ता वाढीस लागली आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक व आरोग्यदायी स्पर्धा निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे. या उपक्रमामुळे गावातील ध्वजारोहणावरून होणारे राजकीय वाद पूर्णपणे थांबले आहे. गावात शैक्षणिक गुणवत्ता, सामाजिक एकोपा आणि सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. हा निर्णय शाळा शिक्षण समिती व ग्रामसभेत सर्वानुमते घेण्यात आला होता. यासाठी तत्कालीन मुख्याध्यापक राजाराम कंटे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या अनोख्या व प्रेरणादायी उपक्रमाची दखल देशपातळीवरही घेण्यात आली आहे. उत्तर प्रदेशचे शिक्षणमंत्री आशीष पटेल यांनी ४ फेब्रुवारी २०२४ मध्ये लखनौ येथे संजय हांडोरे पाटील यांना विशेष आमंत्रित करून या उपक्रमाचे कौतुक करत त्यांचा यथोचित सत्कार केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

