मुलुंडमध्ये सुगी महोत्सवाचे आयोजन
मुलुंडमध्ये सुगी महोत्सवाचे आयोजन
मुलुंड, ता. २५ जानेवारी (बातमीदार) : महाराष्ट्र सेवा संघ आणि मुंबई स्वयंपाकघर यांच्या संयुक्त विद्यमाने सुगी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव ६ ते ८ फेब्रुवारी या कालावधीत मुलुंड येथील महाराष्ट्र सेवा संघात होणार आहे.
शुक्रवार, ६ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता महोत्सवाचे उद्घाटन खाद्यसंस्कृती इतिहासकार मोहसिना मुकादम आणि शेतकरी मोहन अनपट यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी सेवा संघाच्या टेरेसवर विविध पारंपरिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्याची संधी मिळणार असून, खास गप्पांचा कार्यक्रम रंगणार आहे. शनिवार, ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.३० वाजता सुप्रसिद्ध बेकर प्रिया वाडकर यांचे प्रात्यक्षिक होणार असून, त्यांच्याशी संवाद प्राजक्ता कणेगावकर साधणार आहेत. दुपारी १ वाजता पद्मसाळी पाककृतीचे प्रात्यक्षिक शुभांगी जोशी सादर करणार आहेत. संध्याकाळी ६ वाजता हुरडा पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच मराठवाड्याच्या खास खाद्यसंस्कृतीवर आधारित गप्पा-टप्पा कार्यक्रमात चिन्मयी सुमित, नंदू माधव, प्रतीक्षा लोणकर, सायली राजाध्यक्ष, चंद्रकांत कुलकर्णी सहभागी होणार असून, संवादक म्हणून भक्ती चपळगावकर असणार आहेत. रविवार, ८ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता भक्ती चपळगावकर, अल्पना खंदारे आणि सागर दामले विविध खाद्यपदार्थांची प्रात्यक्षिके सादर करणार आहेत. या सुगी महोत्सवाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

