वेणगावमधून परिवर्तन विकास आघाडीचा प्रचार सुरू
वेणगावमधून परिवर्तन विकास आघाडीचा प्रचार सुरू
कर्जत तालुक्यात निवडणुकीचे वातावरण तापले
कर्जत, ता. २५ (बातमीदार) ः कर्जत तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी निवडणुका आता अंतिम टप्प्याकडे सरकत असून, राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या संयुक्त परिवर्तन विकास आघाडीने वेणगाव जिल्हा परिषद वॉर्डातून आपल्या प्रचाराचा अधिकृत शुभारंभ केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांच्या उपस्थितीत हा प्रचार प्रारंभाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
वेणगाव जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या बीड पंचायत समिती गणातील सांगवी येथील सोमजाई मंदिरात श्रीफळ वाढवून प्रचाराची सुरुवात करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद उमेदवार उषा अंकुश ठोंबरे तसेच बीड पंचायत समिती गणातील उमेदवार नमिता सुधाकर घारे यांच्या प्रचारासाठी दोन्ही पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रचाराच्या प्रारंभी देवाचे आशीर्वाद घेऊन परिवर्तन विकास आघाडीने विकासाभिमुख राजकारणाचा संदेश मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार व्यक्त केला. यानंतर सुधाकर घारे आणि नितीन सावंत यांनी वेणगाव पंचायत समिती गणातील लाडवली येथील हनुमान मंदिरात भेट देत उमेदवार चित्रा जगदीश ठाकरे यांच्या प्रचारालाही सुरुवात केली. गावोगावी जाऊन मतदारांशी संवाद साधत परिवर्तन विकास आघाडीने विकास, पायाभूत सुविधा, रोजगार, पाणीपुरवठा आणि ग्रामीण भागातील मूलभूत प्रश्नांवर लक्ष केंद्रित करण्याचे आश्वासन दिले.
.................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

