नेरुळमध्ये नाल्यावरचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त
नेरूळमध्ये नाल्यावरचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त
नमुंमपाच्या अतिक्रमण विभागाची धडक कारवाई
वाशी, ता. २५ (बातमीदार) : नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार अतिक्रमण विभागाने नेरूळ विभागात नाल्यावर उभारलेले अनधिकृत बांधकाम अखेर जमीनदोस्त केले. अतिरिक्त आयुक्त (२) डॉ. राहुल गेठे व उपआयुक्त (अतिक्रमण) डॉ. कैलास गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
नेरूळ विभागातील शिवाजीनगर, शिरवणे नोड येथील एल.पी. कॉर्नरजवळ परशुराम पाटील यांनी गटर व नाल्यावर अनधिकृत बांधकाम केले होते. त्यामुळे पावसाळ्यात परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचत असून, जागेचा अवैध व्यावसायिक वापरही सुरू असल्याचे आढळून आले होते. याप्रकरणी ३१ जुलै २०२५ रोजी सात दिवसांची नोटीस देण्यात आली होती. मात्र, मुदतीत बांधकाम न हटविल्याने शुक्रवार, २३ जानेवारी रोजी निष्कासन मोहीम राबविण्यात आली.
सहाय्यक आयुक्त डॉ. अनुराधा बाबर यांच्या उपस्थितीत १६ मजूर, जेसीबी, डंपर व गॅस कटरच्या सहाय्याने, पोलीस बंदोबस्तात हे बांधकाम पूर्णतः हटविण्यात आले. पाणी निचऱ्यास अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांवर पुढेही कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

