नेरूळ सेक्टर ८ मधील भरणा केंद्र सुरू करण्याची मागणी
नेरूळ सेक्टर ८ मधील भरणा केंद्र सुरू करण्याची मागणी
नेरूळ, ता. २५ (बातमीदार) : नेरूळ सेक्टर आठ परिसरातील ज्ञानेश्वर शेलार कला केंद्रात सुरू असलेले पाणी व मालमत्ता कर देयक भरणा केंद्र गेल्या काही दिवसांपासून बंद असल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. त्यामुळे हे भरणा केंद्र तात्काळ सुरू करण्याचे निर्देश महापालिका प्रशासनाला द्यावेत, अशी मागणी युवासेनेचे सरचिटणीस निखिल मांडवे यांनी केली आहे.
या भरणा केंद्रामुळे नेरूळ सेक्टर ६, सारसोळे गाव, सेक्टर १० तसेच जुईनगर नोडमधील रहिवाशांना घराजवळच मालमत्ता कर व पाणीपट्टी भरण्याची सुविधा उपलब्ध झाली होती. मात्र केंद्र बंद असल्याने नागरिकांना पुन्हा दूरच्या कार्यालयात जावे लागत आहे.
समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने भरणा केंद्र सुरू करावे, अशी मागणी युवासेनेकडून करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

