नवी मुंबईतील गावठाण भागात मलनिःसारण व्यवस्थेचा बोजवारा

नवी मुंबईतील गावठाण भागात मलनिःसारण व्यवस्थेचा बोजवारा

Published on

नवी मुंबईतील गावठाण भागात मलनिस्सारण व्यवस्थेचा बोजवारा
सांडपाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका
जुईनगर, ता. २५ (बातमीदार) : नवी मुंबईतील विविध गावठाण भागांमध्ये मलनिस्सारण व्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, गेल्या काही महिन्यांपासून नियमितपणे सकाळच्या वेळेत सांडपाणी थेट रस्त्यावर वाहत असल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
नेरूळ सेक्टर ६ मधील सारसोळे गाव परिसरात मलनिस्सारण वाहिनी भरून सांडपाणी साई अपार्टमेंटमधील दुकानांमध्ये शिरल्याची घटना घडली. तातडीने नागरिकांनी महापालिकेशी संपर्क साधल्यानंतर जेटिंग मशीनद्वारे सफाई करण्यात आली. मात्र, नेरूळ गावातील त्रिंबक निवास समोरील रस्ता तसेच साईबाबा मंदिराजवळ सकाळच्या वेळेत सांडपाणी रस्त्यावर वाहत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
या सांडपाण्यातूनच शाळकरी मुले, नोकरदार व ज्येष्ठ नागरिकांना मार्ग काढावा लागत असून, दुचाकीस्वार व पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. डासांचा प्रादुर्भाव वाढून ताप, डेंगी, मलेरिया व त्वचारोगांचा धोका निर्माण झाला आहे.

चौकट
जुन्या वाहिन्या, तात्पुरते उपायच ठरतायत
स्थानिक नागरिकांच्या मते, गावठाण परिसरातील मलनिस्सारण वाहिन्या जुन्या व अरुंद असून, अनधिकृत बांधकामे, प्लॅस्टिक कचरा व गाळ साचल्याने त्या वारंवार तुंबतात. महापालिकेकडून केवळ तात्पुरती सफाई केली जात असून, कायमस्वरूपी उपाययोजना होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. नियमित देखभाल, वाहिन्यांचे रुंदीकरण व ठोस नियोजन न केल्यास नागरिकांचे आरोग्य मोठ्या प्रमाणात धोक्यात येऊ शकते, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com