तारपाच्या संस्कृतीतून जपली पालघर जिल्ह्याने परंपरा*

तारपाच्या संस्कृतीतून जपली पालघर जिल्ह्याने  परंपरा*
Published on

संस्कृती जपणं हेच माझं आयुष्य
तारपावादक भिकल्या धिंडा यांची भावना
पालघर, ता. २५ (बातमीदार) : आपली परंपरा आणि संस्कृती जपणं हेच माझं आयुष्य. तारपाच्या नादातून मी देवाची आराधना केली. त्यामुळेच देवाचा आशीर्वाद लाभला, अशा शब्दांत पालघर जिल्ह्यातील वाळवंडा येथील ज्येष्ठ आदिवासी तारपावादक भिकल्या धिंडा यांनी आपल्या जीवनप्रवासाची भावना व्यक्त केली. त्यांच्या या तपस्वी सांस्कृतिक सेवेला मान्यता देत केंद्र सरकारने त्यांना प्रतिष्ठित पद्म पुरस्कार जाहीर केला आहे.
भिकल्या धिंडा ९२ वर्षांचे आहेत. अवघ्या दहाव्या वर्षापासून ते तारपावादन करीत आहेत. ही कला त्यांच्या कुटुंबात सुमारे ४०० वर्षांपासून चालत आलेल्या वंशपरंपरेचा भाग आहे. आदिवासी संस्कृतीचे प्रतीक मानले जाणारे तारपा वाद्य त्यांनी केवळ वाजवले नाही, तर ते आपल्या जीवनाशी एकरूप करून जपले. देवपूजा, उत्सव, सण-समारंभ आणि सामाजिक कार्यक्रमांत तारपाच्या नादातून त्यांनी आदिवासी जीवनशैलीचे दर्शन घडवले.

परंपरा पुढील पिढीकडे सुपूर्द
उत्कृष्ट तारपावादक म्हणून भिकल्या धिंडा यांची सर्वदूर ओळख आहे. वडिलांकडून मिळालेली ही कला त्यांनी तारपाची निर्मिती आणि वादन या दोन्ही माध्यमांतून जोपासली. जवळपास १० फूट लांबीचा तारपा वाजवणे हे त्यांचे वैशिष्ट्य मानले जाते. आजवर त्यांनी राज्यासह देशातील विविध ठिकाणी आपल्या तारपावादनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले आहे. विशेष म्हणजे, अनेक युवकांना त्यांनी तारपावादनाचे धडे देत ही परंपरा पुढील पिढीकडे सुपूर्द केली आहे. तारपा वाद्याची स्वतः निर्मिती करून ते आपला चरितार्थ चालवतात.

-----
आदिवासी संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्यासाठी भिकल्या धिंडा यांनी आयुष्य वेचले आहे. त्यांचा हा सन्मान संपूर्ण पालघर जिल्ह्यासाठी गौरवाचा क्षण आहे. त्यांच्या कार्यामुळे तारपा वाद्याला आणि आदिवासी संस्कृतीला राष्ट्रीय पातळीवर नवी ओळख मिळाली आहे. - डॉ. इंदुराणी जाखड, जिल्हाधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com