थकीत देयकांसाठी ठेकेदार आक्रमक
थकीत देयकांसाठी ठेकेदार आक्रमक
डहाणू, ता.२७ (बातमीदार)ः डहाणू नगर परिषदेच्या विशेष सभेत नगराध्यक्ष राजेंद्र माच्छी यांनी कार्यकाळात झालेल्या कामांचीच देयके अदा केली जाणार असल्याचे वक्तव्य केले होते. यामुळे काही ठेकेदारांनी थकीत देयके मिळावी, यासाठी थेट जिल्हाधिकाऱ्यांचा पत्र पाठवले आहे. डहाणू परिषदेच्या आरोग्य विभागात वीस वर्षापासून निविदेप्रमाणे कचरा वाहतूक आणि सार्वजनिक सेफ्टीटॅंक खाली करण्याचे काम करीत आहे. या कामाची गेल्या तीन वर्षापासूनची देयके प्रशासक असल्याने काढण्यात आलेली नाहीत. त्यामुळे कचरा उचलण्यासाठी असणाऱ्या कामगारांचा, पगार, भविष्य निर्वाह निधी भरणे अशक्य होत आहे. नगर परिषदेकडे थकीत देयकांची मागणी वारंवार करण्यात आली. मात्र आश्वासनापलीकडे काहीही मिळाले नाही. त्यामुळे आर्थिक परिस्थिती डबघाईला आल्याचे निवेदनात नमूद केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

