

राज्यात पालघर अव्वल
पालकमंत्री गणेश नाईक यांचे प्रतिपादन
पालघर, ता. २७ ः वाढवण बंदर, वडोदरा-मुंबई द्रुतगती मार्ग, अलिबाग-विरार मल्टी-मोडल कॉरिडॉर, बुलेट ट्रेन, समर्पित रेल्वे मार्ग, डहाणू-विरार रेल्वेमुळे जिल्ह्याचा विकास वेगाने होणार आहे. त्यामुळे पालघर जिल्हा राज्यात अव्वल असल्याचे प्रतिपादन वनमंत्री गणेश नाईक यांनी केले.
देशाच्या ७७ व्या प्रजासत्ताकदिनी कोळगाव पोलिस परेड मैदान येथे ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी रोजगार हमी योजनेत सव्वा लाख कुटुंबांना १३४ कोटींची मंजुरी देत स्थलांतर रोखणे, महिलांचे स्वावलंबन वाढवणे, ग्रामीण अर्थचक्राला गती दिल्याचे नाईक यांनी म्हटले. बांबू लागवड योजनेत १० लक्षांहून अधिक रोपांची लागवड झाली असली तरी पुढील तीन वर्षांत अंदाजे एक कोटी बांबू निर्मितीमधून ५० कोटींचे उत्पन्न जिल्ह्यातील शेतकरी यांना मिळणार आहे, तर राज्यातील १० कोटी वृक्षलागवड मोहिमेत जिल्ह्यासाठी ५० लाख वृक्षांचे उद्दिष्ट असताना ४५ लाख वृक्षलागवड पूर्ण झाली आहे. ‘जलतारा’ जलसंधारण उपक्रमामध्ये तीन लाख जलतारे प्रस्तावित आहेत, असे नाईक यांनी म्हटले. २०० शेततळ्यांची कामे सुरू असून, मोखाड्यातील पोशेरा येथे ३४ शेततळे पूर्ण झाल्याची माहिती त्यांनी दिली.
----------------------------
कुपोषण निर्मूलनाचा संकल्प
ः- वनहक्क कायदाअंतर्गत ६० हजार हेक्टरवरील ५१ हजार ५२९ वैयक्तिक व सामूहिक वन दावे मंजूर करत पालघर देशात अग्रस्थानी आहे. स्वामित्व योजनेत ८३३ गावांचे ड्रोन सर्वेक्षण, ५० हजार प्रॉपर्टी कार्ड, १६ हजार सनद वितरित करण्यात आले आहेत.
ःः- आदिवासी प्रकल्प कार्यालयांच्या कामगिरीमुळे क्रीडा, आर्थिक साक्षरता व कौशल्य विकासाला चालना मिळाली आहे. कामगार कल्याण, लेक लाडकी योजना, कुपोषण निर्मूलन, सिकलसेल तपासणी, हत्तीरोग निर्मूलन मोहिमांमुळे सामाजिक सुरक्षिततेचा मजबूत पाया घातला जात आहे.
-----------------------------
भिकल्या धिंडा यांचे कौतुक
जनता दरबाराच्या माध्यमातून २,०६५ अर्जांपैकी १,८५३ अर्जांवर कार्यवाही पूर्ण केल्याचे त्यांना सांगितले. तसेच येत्या काळात सर्व तालुक्यामध्ये जनता दरबार घेणार असल्याचे नाईक म्हणाले. या वेळी पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी कर्मचारी, विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्र देण्यात आले. तसेच जव्हारचे तारपावादक भिकल्या धिंडा यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांनी शुभेच्छा दिल्या.
-------------------------------
बहाडोली जांभळांना नवी बाजारपेठ
जीआय टॅग मानांकित ‘बहाडोली जांभळा’च्या मूल्यवर्धनासाठी अत्याधुनिक एकात्मिक प्रक्रिया केंद्र उभारले जात आहे. संयुक्त वन व्यवस्थापन समितीमार्फत चालणाऱ्या प्रकल्पातून गोठवलेला जांभूळ गर, बी-पावडर, आरोग्यदायी सिरका तयार होणार असून ‘महाब्रँड’, ‘वनधन केंद्र’ आणि ई-कॉमर्सद्वारे थेट बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. यामुळे मध्यस्थांची साखळी संपून नफा थेट उत्पादकांपर्यंत पोहोचेल, असे नाईक म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.