पान ३ पट्टा

पान ३ पट्टा

Published on

बंद पथदिवे दुरुस्तीची मागणी
बोर्डी (बातमीदार)ः झाई बोरीगाव ग्रामपंचायत क्षेत्रातील दुर्गम भागात रस्त्यावरील पथदिवे तातडीने दुरुस्त करण्यात यावेत जेणेकरून सुरक्षेचा प्रश्न हाताळण्यास मदत होईल, अशी मागणी या भागातील सामाजिक कार्यकर्ते राजकुमार सावे यांनी केली आहे. महाराष्ट्र आणि गुजरात राज्याच्या सीमेवर असलेल्या झाई बोरीगाव गावातून गुजरात राज्यातील औद्योगिक वसाहतीत हजारो कामगार कामासाठी जात असतात. या भागात बिबट्याची दहशत वाढली आहे. त्यामुळे मानवी सुरक्षा ऐरणीवर आली असल्याने बोरीगाव ग्रामपंचायतीने ग्रामीण भागातील रस्त्यावरील सौर, विजेवर चालणारे पथदिवे दुरुस्त करून ग्रामस्थांना दिलासा द्यावा, अशी मागणी परिसरातील ग्रामपंचायत सदस्यांकडे केली आहे
ः-----------------------------------------------------
‘नव्या तंत्रज्ञानानुसार अभ्यासक्रम हवा’
विरार (बातमीदार)ः विरार सत्पला येथील ज्ञानदीप मंडळ संचालित सेंट जोसेफ कला आणि वाणिज्य महाविद्यालय यांच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने ३० वे वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण सोहळा झाला. ज्येष्ठ धर्मगुरू मॉन्सिनिअर फ्रान्सिस कोरीया हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान होते. यावेळी नवीन तंत्रज्ञानानुसार महाविद्यालयीन अभ्यासक्रमात बदल केला नाहीतर स्पर्धेत टिकू शकणार नाहीत. अभ्यासक्रमाला उद्योगपूरक असे बनवायला हवे, असेफा. डॉ. जॉन रोझ, एस. जे. (संचालक, सेंट झेवियर्स इन्स्टिट्यूट, माहिम) यांनी सांगितले. या वेळी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कॉलेजमधून प्रशिक्षण, नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाईल, असे सांगितले. यावेळी नगरसेवक डॉमणिक रुमाव यांचा सत्कार करण्यात आला. ज्ञानदीप मंडळाचे अध्यक्ष स्टॅनीसलॉस लोबो, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.टी.एन. घोरुडे, ज्ञानदीप मंडळाचे विश्वस्त, पदाधिकारी उपस्थितहोते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com