केएमसी महाविद्यालयात एचआयव्ही तपासणी शिबिर

केएमसी महाविद्यालयात एचआयव्ही तपासणी शिबिर

Published on

केएमसी महाविद्यालयात एचआयव्ही तपासणी शिबिर
खालापूर, ता. २७ (बातमीदार) : केएमसी महाविद्यालय, खोपोली येथे एचआयव्ही तपासणी व जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. इनर व्हील क्लब ऑफ खोपोली आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, खोपोली यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर पार पडले. शिबिराचे उद्घाटन केटीएसपी मंडळाचे संतोष जंगम, दिलीप पोरवाल तसेच मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
शासकीय रुग्णालयातील प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी संपूर्ण गोपनीयता व दक्षता राखत तपासणी केली. या शिबिरात महाविद्यालयातील ३८ एनसीसी कॅडेट्सनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या वेळी इनर व्हील क्लबच्या वतीने एचआयव्हीविषयी जनजागृतीसाठी गायन व भाषण स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धांतील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली.
एचआयव्हीबाबत समाजात जागृती निर्माण करणे व वेळेवर तपासणीचे महत्त्व अधोरेखित करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे एएनओ कॅप्टन शीतल कृष्णा गायकवाड यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com