ठाणे पोलिस ग्रामीण अधीक्षक कार्यालय राज्यात प्रथम

ठाणे पोलिस ग्रामीण अधीक्षक कार्यालय राज्यात प्रथम

Published on

ठाणे पोलिस ग्रामीण अधीक्षक कार्यालयाचा डंका
ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत राज्यात प्रथम
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २७ : १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत ठाणे ग्रामीण अधीक्षक कार्यालयाने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे, तर ३६ जिल्हाधिकारी कार्यालयात ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय दुसरे आले आहे. २९ महापालिकांमध्ये उल्हासनगर तिसऱ्या तर नवी मुंबईने चौथा क्रमांक पटकावला आहे. प्रजासत्ताकदिनी विजयाची घोषणा झाल्याने हा ठाणे जिल्ह्याचा विशेष गौरव ठरला आहे.
१५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्व सरकारी कार्यालयांच्या कामगिरीचे अंतिम मूल्यमापन भारतीय गुणवत्ता परिषद यांच्यामार्फत करण्यात आले. यामध्ये कार्यालयाची अधिकृत वेबसाईट, आपले सरकार, ई-ऑफिस, डॅशबोर्ड, व्हॉट्सॲप चॅटबॉट आणि एआय, ब्लॉकचेन व जीआयएस तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर अशा सात सर्वंकष मुद्यांवर उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरी बजवणाऱ्यापैकी ३४ ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयात ठाणे ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयाने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. ठाणे ग्रामीण अधीक्षक कार्यालयाला २०० पैकी १६८.२५ गुण मिळाले. ठाणे ग्रामीण पाठोपाठ नागपूर (ग्रामीण), अकोला, पुणे (ग्रामीण) आणि रत्नागिरी, असे पाच क्रमांक काढले आहेत.

ठाणे जिल्हाधिकारी दुसऱ्या क्रमांकावर
राज्यात ३६ जिल्हाधिकारी कार्यालयात ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय दुसऱ्या क्रमांकावर राहिला. अवघ्या १.२५ गुणांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाचा पहिला क्रमांक हुकला आहे. यंदा जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने २०० गुणांपैकी १८६ गुण मिळवून प्रथम क्रमांकावर झेप घेतली आहे, तर ठाण्याला १८६.७५ गुण मिळाले आहेत. तिसऱ्या क्रमांकावर धाराशिव, लातूर आणि कोल्हापूर या जिल्हाधिकारी कार्यालयांचा क्रमांक लागत आहे.

महापालिकेच्या यादीत उल्हासनगर, नवी मुंबई तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर
२९ महापालिकांमध्ये ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर आणि नवी मुंबई महापालिकेचे नाव पाच क्रमांकामध्ये तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत. मात्र, ठाणे महापालिका, कल्याण-डोंबिवली, मिरा-भाईंदर यांचे नाव टॉप पाचमध्ये दिसत नाही. यामध्ये पहिला क्रमांक पनवेल महापालिकेने पटकावला आहे. त्या खालोखाल पुणे, उल्हासनगर, नवी मुंबई आणि अमरावती अशी क्रमवारी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com