अलिबाग जिल्हा कारागृहात बंद्यांसाठी विशेष स्पर्धा
अलिबाग जिल्हा कारागृहात बंद्यांसाठी विशेष स्पर्धा
विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान
अलिबाग, ता. २७ (वार्ताहर) : भारताच्या ७७व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त अलिबाग जिल्हा कारागृहातील बंद्यांसाठी विविध विशेष स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. कारागृहातील बंद्यांना स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाची जाणीव व्हावी, तसेच देशाविषयी आपुलकी व आत्मविश्वास निर्माण व्हावा, या उद्देशाने देशभक्तीपर गाणे, रांगोळी, मेहंदी, चित्रकला, बुद्धीबळ, कॅरम आणि देशभक्तीपर निबंध अशा स्पर्धा घेण्यात आल्या.
या स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बंद्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या हस्ते प्रमाणपत्रे देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) ललिता दहितुले व शिक्षणाधिकारी (माध्यमिक) महारुद्रा नाले यांनी शिक्षणाचे महत्त्व सांगून बंद्यांना पुढील शिक्षणाबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी नेहा भोसले यांनी बंद्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत, जिल्हा उद्योग केंद्र व कौशल्य विभागामार्फत मिळणाऱ्या प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन केले. या उपक्रमातून बंद्यांच्या पुनर्वसनास मदत होईल, असे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमास कारागृह अधीक्षक विशाल बांदल यांच्यासह विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी व कारागृह अधिकारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

