दिव्यातून २४ किलो २०० ग्रॅम वजनाच्या गांजासह त्रिकुट जेरबंद ;
दिव्यात अंमली पदार्थांसह त्रिकुट जेरबंद
मुंब्रा पोलिसांची मोठी कारवाई
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २८ : दिवा-दातीवली रोड येथील एका घरातून मुंब्रा पोलिसांनी अंमला पदार्थांसह आंतरराज्य टोळीच्या तीन सदस्यांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून २४ किलो २०० ग्रॅम गांजा जप्त केला असून याची किंमत सहा लाख ५ हजार ७०० रुपये आहे. या कारवाईमुळे अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांचे मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दिवा-दातीवली परिसरातील एका घरात मोठ्या प्रमाणात गांजाचा साठा करून त्याची विक्री केली जाणार असल्याची माहिती मुंब्रा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांना मिळाली होती. यानुसार पोलिसांनी शनिवारी (ता. २४) संबंधित ठिकाणी सापळा रचत छापा टाकला. यामध्ये २४ किलो २०० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करत गुड्डु हलदार (२७), व्यंकटेश पिरमर (३५) आणि रुबीदेवी केवट (३८) या त्रिकुटला पोलिसांनी जेरबंद केले. यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. मुंब्रा पोलिस ठाण्यात एनडीपीएस कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. या गुन्हयाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

