पोयनाड परिसरात ७७ व्या प्रजासत्ताक दिनाचा उत्साह पोयनाड परिसरात ७७ व्या प्रजासत्ताक दिनाचा उत्साह
पोयनाड परिसरात ७७ व्या प्रजासत्ताक दिनाचा उत्साह
पोयनाड, दि. २७ (बातमीदार) : तालुक्यातील पोयनाड परिसरात विविध गावांसह दुर्गम भागात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. पोयनाड पोलिस स्टेशन, विविध शासकीय कार्यालये, राष्ट्रीयकृत बँका, शाळा, महाविद्यालये येथे सकाळच्या सुमारास मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.
पेझारी येथील कोएसो नाना पाटील संकुलात ध्वजारोहणानंतर एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी शानदार संचलन केले. तसेच विविध गावांमध्ये प्रभातफेरी व तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यंदाचे वर्ष हे वंदे मातरम या गीताचे १५० वे वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. या निमित्ताने विविध शाळांमध्ये वंदे मातरम या गीताचे सामूहिक गायन करण्यात आले.
यासह पोयनाड परिसरातील कुर्डुस नजीक दुर्गम भागात असलेल्या भोमोली, डांगी, गावठाण, कोंझरवाडी, वाघजई या शाळांमध्ये मोठया उत्साहात सांस्कृतिक कार्यक्रमांसह प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम उत्साहात झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

