पोलादपूर तालुक्यात  भारतीय प्रजासत्ताक दिन  उत्साहात साजरा

पोलादपूर तालुक्यात भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

Published on

प्रजासत्ताक दिनानिमित्त संविधानाची शपथ
पोलादपूर, ता. २७ (बातमीदार) ः पोलादपूर तहसीलदार कार्यालयात तहसीलदार कपिल घोरपडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संविधानाची एकत्रित शपथ घेतली. पोलादपूर पोलिस स्टेशनतर्फे मानवंदना देण्यात आली.
या कार्यक्रमास पोलादपूर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक आनंद रावडे, पोलादपूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी दिप्ती गाट, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विनय शिपाई, नगराध्यक्षा स्नेहा मेहता, सर्व नगरसेवक, माजी सैनिक, पत्रकार, शाळकरी विद्यार्थी तसेच राजकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रजासत्ताक दिनाच्या या कार्यक्रमातून देशाच्या संविधानिक मूल्यांप्रती निष्ठा व्यक्त करण्यात आली. संपूर्ण तालुक्यात देशभक्तीपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com