ऑपरेशन लोटसच्या भीतीने शिंदे गट अस्वस्थ

ऑपरेशन लोटसच्या भीतीने शिंदे गट अस्वस्थ

Published on

शिंदे गटाला ‘ऑपरेशन लोटस’ची धास्ती
उल्हासनगरात सत्तेचा पेच कायम; नगरसेवकांना सुरक्षित स्थळी नेल्याची चर्चा
नवनीत बऱ्हाटे : सकाळ वृत्तसेवा
उल्हासनगर, ता. २७ : उल्हासनगर महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल लागून १२ दिवस उलटले तरी सत्तेचा सस्पेन्स अद्याप संपलेला नाही. स्पष्ट बहुमत असूनही शिवसेना (शिंदे गट) कमालीची अस्वस्थ दिसत असून, भारतीय जनता पक्षाकडून ‘ऑपरेशन लोटस’ राबवले जाण्याच्या भीतीने शिवसेनेने आपल्या नगरसेवकांची तटबंदी अधिक मजबूत करण्यास सुरुवात केली आहे.

शिवसेनेकडे सत्तेसाठी आवश्यक असलेला जादुई आकडा आहे. सोबतीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासारखे खंबीर नेतृत्व आहे; मात्र, तरीही सत्तास्थापनेच्या प्रक्रियेत कमालीची गुप्तता पाळली जात आहे. अधिसूचना जाहीर होण्यापूर्वीच आपल्या नगरसेवकांना सुरक्षित स्थळी (रिसॉर्ट पॉलिटिक्स) हलवल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि टीम ओमी कलानी यांनी प्रत्यक्ष नगरसेवकांवर लक्ष ठेवत कोणत्याही प्रकारची जोखीम न पत्करण्याचे धोरण अवलंबले आहे.

भाजपचा आक्रमक पवित्रा
एकीकडे शिवसेना सावध असतानाच, भाजपने मात्र आक्रमक पवित्रा घेतला आहे. शिवसेनेच्या या भीतीची भाजप नगरसेवकांकडून उघडपणे खिल्ली उडवली जात आहे. ‘‘जर बहुमत आहे, तर नगरसेवकांना लपवण्याची गरज काय,’’ असा सवाल भाजप नेते करत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपचे वरिष्ठ नेतृत्व सक्रिय झाल्यास सत्तेचे समीकरण शेवटच्या क्षणी बदलू शकते, असा दावा केला जात आहे.

अविश्वासाची भिंत
बहुमताचा आकडा गाठूनही नगरसेवकांवर अविश्वास आहे का, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. ओमी कलानी आणि डॉ. श्रीकांत शिंदे यांची ‘फील्डिंग’ भाजपच्या रणनीतीला थोपवणार का, तसेच महापौर निवडीच्या दिवशी प्रत्यक्षात काय घडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com