भिवंडीत हळदी-कुंकूचे आयोजन
भिवंडीत हळदी-कुंकूचे आयोजन
विरार, (बातमीदार) : भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समिती, दुगाड फाटा येथे श्रमजीवी संघटनेच्या वतीने हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभास वसई विधानसभेच्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.
या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे सधवांबरोबरच विधवा महिलांचाही सन्मान करण्यात येतो. सधवा आणि विधवा असा कोणताही भेद न करता सर्व महिलांना समानतेचा अधिकार देत, स्त्री सन्मान, स्वाभिमान व सामाजिक समतेचा संदेश देणारा हा उपक्रम गेल्या २००८ सालापासून सातत्याने विविध तालुक्यांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. या हळदी-कुंकू कार्यक्रमात हजारो महिलांनी एकत्र येत सधवा-विधवा असा भेद न करता ‘स्त्री’ या एकाच ओळखीने सहभागी होत, आपल्या हक्कांचा आणि सन्मानाचा उत्सव साजरा केला. या कार्यक्रमाला आमदार स्नेहा दुबे यांच्यासह भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका नीलम पाटील, डॉ. दुमाड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ. आकांक्षा पंडित, श्रमजीवी संघटनेच्या ठाणे जिल्हा महिला ठिणगी प्रमुख जया पारधी, संघटनेचे उपाध्यक्ष सागर देसक, पदाधिकारी आशा भोईर, विश्वनाथ पासारी, शेवंता पासारी, लक्ष्मी डबाळे, पार्वती पवार, कुलवंती शेलार, मंदा संवर, लक्ष्मी मुकणे तसेच हजारोच्या संख्येने महिला, संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

