जीवनदीप महाविद्यालयात स्पंदन महोत्सव

जीवनदीप महाविद्यालयात स्पंदन महोत्सव
Published on

जीवनदीप महाविद्यालयात ‘स्पंदन’ महोत्सव
लोककलेच्या सादरीकरणाने जिंकली मने
टिटवाळा, ता. २७ (वार्ताहर) : विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्यातील व्यवस्थापन कौशल्याला चालना देण्यासाठी टिटवाळा येथील जीवनदीप महाविद्यालयाच्या व्यवस्थापन शाखेने ‘स्पंदन महोत्सवा’चे शानदार आयोजन केले होते. भारतीय संस्कृती आणि परंपरेचे जतन करण्याच्या उद्देशाने आयोजित या महोत्सवाचे संपूर्ण नियोजन स्वतः विद्यार्थ्यांनीच केल्याने त्यांचे विशेष कौतुक होत आहे. महोत्सवाची सुरुवात गणरायाच्या चरणी दीपप्रज्वलन करून करण्यात आली. या वेळी महाविद्यालयात विविध स्पर्धांची रेलचेल पाहायला मिळाली.

नृत्य, गायन, एकपात्री अभिनय आणि फॅशन शो, मेहंदी, रांगोळी आणि फोटोग्राफीमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या महोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे डॉ. प्रा. शिवाजी वाघमारे यांचे सादरीकरण. त्यांनी ‘माझी मैना गावाकडं राहिली’, संत जनाबाईंचे प्रबोधनपर अभंग आणि भारुड यांसारख्या लोककला सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. लोककलेच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही केले.

मान्यवरांचे मार्गदर्शन
जीवनदीप शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष रवींद्र घोडविंदे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत उत्तम करिअरसाठी अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे महत्त्व पटवून दिले. प्रा. महेश थोरात यांनीही विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. महोत्सवाच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक वाघ, संचालक प्रशांत घोडविंदे, उपप्राचार्य हरेंद्र सोष्टे आणि व्यवस्थापन शाखाप्रमुख उल्हास गायकर यांनी विशेष परिश्रम घेतले. प्रा. निकिता घोडविंदे, प्रा. सचिन कांबळे, प्रा. शैलेजा मिश्रा यांच्यासह सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने हा महोत्सव दिमाखात झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com