तळा तालुक्यात ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

तळा तालुक्यात ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

Published on

तळा तालुक्यात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
तळा, ता. २७ ः तालुक्यातील सर्व शाळा, महाविद्यालय, सरकारी कार्यालय या ठिकाणी प्रजासत्ताक दिनाचा उत्साह पहायला मिळाला. रायगड जिल्हा परिषदेच्या तळे मराठी शाळेतील नवोदय परीक्षा उत्तीर्ण झालेल्या रुद्र थिटेकर या विद्यार्थ्याला ध्वज फडकविण्याचा मान देण्यात आला. आणि नगरपंचायत येथे नगराध्यक्षा माधुरी घोलप यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. तसेच तहसील कार्यालय तळा येथे तहसीलदार स्वाती पाटील यांच्या हस्ते तालुक्याचे ध्वजवंदन पार पडले.
तहसीलदार दालनात तहसीलदार स्वाती पाटील यांनी उपस्थित सर्व मान्यवरांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच ५ फेब्रुवारीला पंचायत समिती व जिल्हा परिषदेसाठी मतदान पार पडणार असून सर्वांनी मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन केले. याप्रसंगी तालुक्यातील प्रतिष्ठित मान्यवर, अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com