सूत्रकार आश्रमशाळेत विद्यार्थ्यांचा ‘नवांकुर’ उत्सव

सूत्रकार आश्रमशाळेत विद्यार्थ्यांचा ‘नवांकुर’ उत्सव

Published on

सूत्रकार आश्रमशाळेत विद्यार्थ्यांचा ‘नवांकुर’ उत्सव

तलासरी, ता. २७ (बातमीदार) : सूत्रकार येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेमधील विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला व्यासपीठ देणाऱ्या ‘नवांकुर’ या हस्तलिखिताचे प्रजासत्ताकदिनानिमित्त प्रकाशन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या लेखन, चित्रकला व कल्पनाशक्तीला चालना देणारा हा उपक्रम यंदाही मोठ्या उत्साहात पार पडला.
शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये दडलेल्या साहित्यिक व कलागुणांना वाव मिळाला, तसेच त्यांच्यातील अभिव्यक्ती अधिक सशक्त व्हावी या उद्देशाने ‘नवांकुर’ हा उपक्रम दरवर्षी सातत्याने राबविला जात आहे. यावर्षी विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या लेख, कविता, निबंध, रेखाचित्रे व विविध कलाकृतींचा समावेश असलेल्या एकूण सात हस्तलिखितांचे प्रकाशन करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना स्वतःचे विचार मांडण्याची संधी मिळत असून, त्यांच्या आत्मविश्वासात लक्षणीय वाढ होत आहे. वाचन-लेखनाची आवड निर्माण होऊन सृजनशील विचारांची बीजे रुजवली जात असल्याचे शिक्षकांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या कलाकृती पाहून उपस्थित मान्यवरांनीही समाधान व्यक्त केले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सुनील इभाड (डहाणू विधानसभा प्रमुख, शिवसेना), सूत्रकार गावच्या सरपंच माधुरी गोवारी, उपसरपंच चंद्रकांत दुमाडा, ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थीही सर्जनशील क्षेत्रात भरारी घेत असल्याचे मत व्यक्त केले.
‘नवांकुर’ यशस्वी होण्यासाठी शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना लेखन व सादरीकरणासाठी मार्गदर्शन केले. शिक्षकांच्या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांची कल्पनाशक्ती अधिक खुलत गेल्याचे चित्र या हस्तलिखितांतून दिसून येते.
‘नवांकुर’ हे केवळ हस्तलिखित न राहता विद्यार्थ्यांच्या विचारांना दिशा देणारे आणि त्यांच्या सुप्त प्रतिभेला उजाळा देणारे व्यासपीठ बनत असल्याची भावना या वेळी व्यक्त करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com