भवन नाही, संदेश आहे!
भवन नाही, संदेश आहे!
बिहार भवनच्या निर्णयावर मनसेचा व्यंगचित्रातून प्रहार
ठाणे, ता. २७ : मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जमिनीवर उभारल्या जाणाऱ्या प्रस्तावित ‘बिहार भवन’ प्रकल्पावरून सध्या राज्याचे राजकीय वातावरण तापले आहे. या निर्णयाला विरोध करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता आपल्या प्रभावी शस्त्राचा म्हणजे ‘व्यंगचित्राचा’ आधार घेतला आहे. ठाण्यात मनसेच्या जनहित व विधी विभागाच्या वतीने प्रसिद्ध केलेल्या या व्यंगचित्रातून सरकारच्या धोरणांवर बोचरी टीका करण्यात आली आहे.
मुंबई पोर्ट ट्रस्टच्या ज्या जागेवर बिहार भवन प्रस्तावित आहे, त्याच जागेवर सुमारे अडीच हजार गोदी कामगार गेल्या १२ वर्षांपासून हक्काच्या घरासाठी लढा देत आहेत. या कामगारांच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित असताना, ही जमीन बिहार सरकारला बाजारभावापेक्षा कमी दरात उपलब्ध करून दिल्याचा आरोप मनसेने केला आहे. यामुळे स्थानिक मराठी माणूस आणि कामगारवर्गात संतापाची लाट आहे. मुंबई आणि परिसरात आरोग्य सुविधांचा अभाव, घरांची टंचाई आणि वाढती लोकसंख्या हे प्रश्न गंभीर असताना सरकारने बाहेरील राज्यांच्या भवनांना महत्त्व का दिले, असा सवाल मनसेने उपस्थित केला आहे. सरकारने आधी गोदी कामगारांचे पुनर्वसन करावे आणि त्यानंतरच इतर प्रकल्पांचा विचार करावा, अशी ठाम भूमिका पक्षाने मांडली आहे.
राजकीय तणावाचे संकेत
ठाण्यात प्रसिद्ध झालेल्या या व्यंगचित्रामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘मराठी माणूस विरुद्ध परप्रांतीय’ आणि ‘स्थानिक विकास’ हे मुद्दे पुन्हा एकदा ऐरणीवर आले असून, आगामी काळात हा संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.
मुंबई पोर्ट ट्रस्टच्या मोक्याच्या जागेवर ३१४ कोटी खर्चून बिहार भवन उभारणे म्हणजे स्थानिक कामगारांच्या हितावर घाला घालण्यासारखे आहे. केवळ परप्रांतीय मतदारांना खूश करण्यासाठी सर्वसामान्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न बाजूला सारणे अन्यायकारक आहे.
- स्वप्नील महिंद्रकर, ठाणे शहर अध्यक्ष, जनहित व विधी विभाग, मनसे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

