बँक कर्मचाऱ्यांच्या संपामुळे गैरसोय

बँक कर्मचाऱ्यांच्या संपामुळे गैरसोय

Published on

बँक कर्मचाऱ्यांच्या संपामुळे गैरसोय
पालघर जिल्ह्यात सलग चार दिवस बंद व्यवहार ठप्प
पालघर, ता.२७ ः जिल्ह्यातील बँक कर्मचाऱ्यांच्या एकदिवसीय संपामुळे मंगळवारी आर्थिक व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिक, व्यापारी तसेच व्यावसायिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय झाली.
बँकांचे व्यवहार आठवड्याला केवळ पाच दिवस असावेत, या मागणीसह इतर प्रलंबित मागण्यांसाठी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनच्या नेतृत्वात हा संप पुकारण्यात आला आहे. या संघटनेनंतर्गत आठ बँक अधिकारी कर्मचारी संघटनानी सहभाग घेऊन काम बंद होते. या आंदोलनामुळे सार्वजनिक बँकांच्या जवळपास सर्व शाखा बंद राहिल्याने धनादेश वटवणे, रोख रक्कम जमा-काढणे, कर्ज व्यवहार, खात्यातील दुरुस्त्या अशी महत्त्वाची कामे रखडली. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, ग्रामीण भागातील नागरिक आणि रोजच्या व्यवहारासाठी बँकांवर अवलंबून असलेल्या लघुउद्योजकांना मोठा फटका बसला. अनेक ठिकाणी एटीएममध्ये पैसे संपल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे सकाळपासूनच नागरिकांनी एटीएमसमोर लांबच लांब रांगा लागल्या.
----------------------------
‘डिजिटल’वर भीस्त
ग्रामीण भागात इंटरनेट, डिजिटल व्यवहारांची सुविधा मर्यादित असल्याने अडचणी अधिक वाढल्या. बँक कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी हा संप पुकारल्याचे सांगण्यात आले. वेतनवाढ, कामाचे तास, खासगीकरणाला विरोध, कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेशी संबंधित मागण्यांसाठी संप करण्यात आल्याचे संघटनांचे म्हणणे आहे. मात्र, नागरिकांनी शक्य असल्यास डिजिटल व्यवहारांचा वापर करावा, असे आवाहन बँकांकडून करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com