टांग्याच्या अपघातात लहान मुलगी गंभीर जखमी

टांग्याच्या अपघातात लहान मुलगी गंभीर जखमी

Published on

टांग्याच्या धडकेत मुलगी गंभीर जखमी
केळवे बिचवरील प्रकार; पोलिसांकडून परवाने रद्द
पालघर, ता. २७ ः केळवे समुद्रकिनारी फिरायला गेलेल्या पालघरमधील एका १२ वर्षीय मुलीला टांग्याची जोरदार धडक बसली. या अपघातात ही मुलगी गंभीर जखमी झाली. सोमवारी (ता. 26) ही घटना घडली. जान्हवी पाटील असे या मुलीचे नाव असून, या अपघतामुळे तिच्या डोळे, खांद्यांसह यकृत आणि मूत्रपिंडला मोठी इजा झाली आहे. किनारी पर्यटकांना फिरवण्यासाठी असलेले टांगे, उंट सफर, बीच बाइक यांचे परवाने मुदत संपल्याची बाब यानिमित्ताने समोर आली आहे. हे सर्व प्रकार बंद करण्याचा निर्णय केळवे सागरी पोलिस ठाण्याने घेतला आहे. घटना घडल्यानंतर याबाबत संबंधित घोडागाडीचालकाने अथवा इतर व्यावसायिकांनी पोलिसांना माहिती देण्याचे टाळले.
जान्हवी पाटील ही सोमवारी सुट्टीनिमित्त आपल्या सोसायटीमधील महिला व आईसह केळवे किनारी आली होती. त्या वेळी किनारी परिसरातून जात असलेल्या एक भरधाव टांग्याने तिला धडक दिली. तसेच टांगा तिच्या पोटावरून गेला. यामुळे ती गंभीर जखमी झाली. प्रथम तिला पालघर येथील रुग्णालयात नेण्यात आले. नंंतर मीरा रोड आणि त्यानंतर मुंबईला अधिक उपचारासाठी हलविण्यात आले. तक्रार दाखल करण्याच्या दृष्टीने केळवे पोलिस अधिक महितीकरिता मुंबईकडे गेले आहेत.

पर्यटकांना धोका
बीच बाइक, सागरी नौकानयन, घोडागाड्या, उंट सफर यासारख्या प्रकारांना महाराष्ट्र सागरी मंडळाने पर्यटनाला वाव मिळावा म्हणून परवानगी दिल्या होत्या. मात्र, नियम मोडून हे सर्व केले जात होते. गिर्हाइक मिळविण्याच्या नादात अनेक वेळा भांडण झाल्याचे प्रकारही घडले आहेत. टांगे, बीच बाइक यांचा मार्गक्रमण ऐन वर्दळीच्या ठिकाणी होत असल्याने पर्यटकांना धोका आहे. यासंदर्भात केळवे सागरी पोलिस ठण्याकडून यापूर्वीदेखील नोटीस बजावली होती. मात्र, सोमवारी घडलेल्या प्रकरणानंतर हा प्रकार बंद करण्याच्या सूचना पोलिसानी दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com