देशभक्तीपर सामूहिक कवायतीचा विश्वविक्रम

देशभक्तीपर सामूहिक कवायतीचा विश्वविक्रम

Published on

देशभक्तीपर सामूहिक कवायतीचा विश्वविक्रम
‘राष्ट्र प्रथम’मध्ये दोन कोटींहून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ : राज्यातील सरकारी, अनुदानित आणि खासगी व्यवस्थापनांच्या शाळांमधील तब्बल दोन कोटींहून अधिक विद्यार्थ्यांसह सात लाख शिक्षकांनी २६ जानेवारीला केलेल्या देशभक्तीपर सामूहिक कवायतीची विश्वविक्रमी नोंद झाली. शालेय शिक्षण विभागाने राबविलेल्या या उपक्रमाची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डने नोंद घेतल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी आज मुंबईत‍ दिली.
शालेय शिक्षण विभागाकडून देशभक्तीपर सामूहिक कवायतींचा विश्वविक्रम केला जाणार असल्याचे वृत्त १३ जानेवारीला ‘सकाळ’ने दिले होते. त्यावर शिक्कामोर्तब झाले असून, या विश्वविक्रमामुळे राज्यातील शाळांमध्ये देशभक्तीच्या गीतांचा एक सामूहिक आविष्कार विश्वविक्रमाच्या नोंदीमुळे जगभरासमोर पहिल्यांदाच अशा प्रकारे गेला असल्याचे मंत्री भुसे यांनी सांगितले. मागील काही महिन्यांपासून विद्यार्थ्यांचा कवायत संचलनाचा सराव सुरू होता. यासाठी शालेय शिक्षण विभागामार्फत १४ मिनिटांचा मार्गदर्शक व्हिडिओ राज्यातील सर्व शाळांना उपलब्ध करून देण्यात आला होता. दोन कोटींहून अधिक विद्यार्थ्यांनी एकाच वेळी सुंदर व शिस्तबद्ध कवायत सादर केली. यात शालेय शिक्षण विभागासोबत आदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व इतर मागास व बहुजन कल्याण विभागातील विद्यार्थ्यांचाही सहभाग होता.
--
एशिया बुकमध्येही नोंद
या उपक्रमासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जिल्हास्तरावर राबविण्यात आलेल्या उपक्रमाच्या अनुषंगाने एशिया बुक ऑफ रेकॉर्डस् आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस् या दोन मान्यवर संस्थांकडूनही स्वतंत्र विश्वविक्रमांची नोंद करण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्र्यांनी दिली.
--
‘राष्ट्र प्रथम’ या उपक्रमाने केवळ विश्वविक्रम प्रस्थापित केला नाही, तर भावी पिढीच्या मनात प्रखर राष्ट्रभक्तीचे बीज रोवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. यापुढे दर शनिवारी देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायतीचा उपक्रम सर्व शाळांमध्ये राबविला जाईल.
- दादा भुसे, शालेय शिक्षणमंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com