नगरसेवक बेपत्ता पोस्टर प्रकरणावर दोन्ही बाजूंनी पोलीस चौकशी

नगरसेवक बेपत्ता पोस्टर प्रकरणावर दोन्ही बाजूंनी पोलीस चौकशी

Published on

नगरसेवक बेपत्ताप्रकरणी तपास सुरू
पदाधिकाऱ्याच्या मृत्यूप्रकरणी दावे-प्रतिदावे
कल्याण, ता. २७ (बातमीदार) : कल्याण पूर्वेतील नगरसेवक बेपत्ता पोस्टर प्रकरण वेगळ्याच टोकाला गेले आहे. दोन्ही बाजूंनी दावे-प्रतिदावे केले जात आहेत. राजकीय दबावाखाली येत शिवसेना ठाकरे गटाच्या एका पदाधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचा आरोप ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. याप्रकरणी दोन्ही बाजूंनी कोळसेवाडी पोलिस तपास करीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
निवडणूक निकालानंतर ठाकरे गटाच्या कल्याण पूर्वेतील दोन नगरसेवकांशी पक्षाचा कसलाही संपर्क होत नसल्याचे सांगत पदाधिकाऱ्यांनी रविवारी (ता. २५) परिसरात नगरसेवक बेपत्ता असल्याबाबत पोस्टर्स लावले होते. यानंतर या पोस्टर्सवर आक्षेप घेत नगरसेवक मधुर म्हात्रेंच्या नातेवाइकांनी पोस्टर्स लावणाऱ्या पदाधिकाऱ्यांविरोधात कोळसेवाडी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. आमचा मुलगा बेपत्ता नसून तो देवदर्शनासाठी गेला आहे. नाहक बदनामी होत असल्याचे मधुर म्हात्रे यांचे वडील उमेश म्हात्रे, तसेच दिव्येश म्हात्रे यांचे म्हणणे आहे.
म्हात्रेंच्या तक्रारीनंतर कोळसेवाडी पोलिसांकडून पोलिस ठाण्यात उपस्थित राहण्यासाठी फोन येत होते. या तणावाखाली येत ठाकरे गटाचे पदाधिकारी रमेश तिखे यांचे सोमवारी (ता. २६) हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाल्याचे पदाधिकारी नीरज दुबे यांनी सांगितले. उमेश म्हात्रे यांनी दाखल केलेली तक्रार चुकीची आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात उच्चस्तरीय चौकशीची मागणी त्यांनी केली आहे. यानंतर दोन्ही बाजूंनी सखोल चौकशी सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याणजी घेटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com