एसआयआयएलसी
एसआयआयएलसी
व्यावसायिक पापड प्रशिक्षण
पुणे, ता. २७ : उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सगळीकडे पापड तयार केले जातात. सध्याच्या धावपळीच्या जीवनात मात्र सगळ्यांनाच पापड तयार करण्याच्या जास्त वेळ लागणाऱ्या प्रक्रियेतून जायचे नसते व ते बाहेरून पापड विकत घेण्यास प्राधान्य देतात. त्यामुळेच व्यावसायिकरीत्या पापड तयार करणे व विक्री करणे हा व्यवसाय फायद्याचा ठरत आहे. या पार्श्वभूमीवर व्यावसायिक पापड प्रशिक्षणाचे आयोजन ३१ जानेवारी व १ फेब्रुवारीला करण्यात आले आहे. यात उडीद पापड, नाचणी पापड, ज्वारी पापड, बाजरी पापड, शेवगा पापड, मेथी पापड, पालक पापड, टोमॅटो पापड, पोह्याचे पापड, राजस्थानी स्पेशल खिचिया पापड, कोल्हापुरी हंडी पापड, उपवासाचे शाबू बटाटा पापड व शाबूचे पापड, तिखट सांडगे, वेगवेगळ्या पद्धतीच्या खारोड्या, पापड आटा, पापड मसाला इत्यादी नावीन्यपूर्ण पापड शिकवले जाणार आहेत. त्याचबरोबर पापड व्यवसायातून मिळणारा नफा, त्यासाठी लागणारी मशिनरी, कमीत कमी गुंतवणुकीमध्ये जास्तीत जास्त नफा देणारा व्यवसाय कसा उभारावा याबाबत मार्गदर्शन दिले जाणार आहे.
पॅकेजिंग तंत्रज्ञान उद्योग कार्यशाळा
प्रक्रिया केलेले सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ, शेतमाल असो वा दूध किंवा पाणी अशा सर्व प्रकारच्या उत्पादनांची पॅकिंग करण्यासाठी पेपर, कोरुगेटेड बॉक्स, लाकूड, प्लॅस्टिक इ. विविध प्रकारचे पॅकेजिंग मटेरिअल लागत असून बाजारात याची प्रचंड मागणी आहे. हे मटेरिअल कसे तयार करतात, त्यासाठी कोणती अद्ययावत यंत्रे लागतात, छोटी पॅकेजिंग इंडस्ट्री सुरू करण्यासाठी आवश्यक भांडवल इ. विषयी सविस्तर माहिती करून देणारा ऑनलाइन प्रमाणपत्र अभ्यासक्रम २ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. यात पॅकेजिंग उद्योगातील वाढत्या संधी, विविध प्रकारच्या मटेरिअलची ओळख, लागणारी यंत्रे, छोटे पॅकेजिंग युनिट सुरू करण्यासाठी आवश्यक बाबी इ. विषयी तज्ज्ञ मार्गदर्शन करतील. ज्यांना पॅकेजिंग इंडस्ट्रीमध्ये स्टार्टअप करायचे आहे. तसेच ज्यांचे पॅकेजिंग युनिट असून त्यांना यातील अद्ययावत तंत्रज्ञान जाणून घ्यावयाचे आहे इ. साठी ही कार्यशाळा फायदेशीर आहे.
डिहायड्रेशन व्यवसाय प्रशिक्षण
निर्जलीकरण व्यवसाय संधींविषयी मार्गदर्शन करणारे प्रशिक्षण थेट निर्जलीकरण उद्योग प्रकल्पात ७ व ८ फेब्रुवारीला होत आहे. प्रशिक्षणात निर्जलीकरण म्हणजे काय, या तंत्रज्ञानाचे महत्त्व, उपयोग, व्यवसाय म्हणून तो कसा करावा, निर्जलीकरणासाठीचे प्रमुख घटक, वेगवेगळ्या पद्धती, निर्जलीकरणाद्वारे तयार होणारे घटक पदार्थ व त्याचे उपयोग, उत्पादन व बाजारातील किंमत, निर्जलीकरणासाठी लागणाऱ्या मशिनरी, त्याचा फ्लो चार्ट, उपलब्ध बाजारपेठ, विपणन पद्धती, शासकीय योजना व अनुदान, प्रकल्प उभारण्यासाठी जागेची निवड, अंदाजे गुंतवणूक, प्रकल्प अहवाल इ. विषयांवर मार्गदर्शन होणार आहे. फळभाज्या, पालेभाज्या, कंद, पानवर्गीय वनस्पती, आयुर्वेदिक वनस्पती, फळे, दुग्धजन्य पदार्थ, मांस, मच्छी, चिकन या पदार्थांचे प्रात्यक्षिक होणार आहे.
एआय-आधारित बिझनेस अॅनालिसिस कार्यशाळा
आजच्या डिजिटल युगात डेटा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) यांचा प्रभावी वापर करून व्यवसाय निर्णय अधिक अचूक आणि जलद घेता येत आहेत. याच पार्श्वभूमीवर एआय-आधारित बिझनेस अॅनालिसिसवरील ६० तासांची ऑनलाइन विशेष प्रशिक्षण कार्यशाळा आयोजिली आहे. कार्यशाळेत पारंपरिक बिझनेस अॅनालिसिस आणि एआय-आधारित अॅनालिसिसमधील फरक स्पष्ट केला जाणार आहे. डेटा संकलन, विश्लेषण, ट्रेंड ओळखणे, अंदाज, निर्णयप्रक्रिया आणि व्यवसाय धोरण आखणीसाठी एआय टूल्सचा कसा वापर करायचा, यावर सविस्तर मार्गदर्शन केले जाईल. तसेच मार्केट अॅनालिसिस, ग्राहक वर्तन समजून घेणे, खर्च-नफा विश्लेषण, रिस्क मॅनेजमेंट आणि परफॉर्मन्स मोजमाप यासाठी एआय कसा उपयुक्त ठरतो, हे प्रत्यक्ष उदाहरणांद्वारे समजावले जाणार आहे. कार्यशाळेमुळे सहभागींची विश्लेषण क्षमता वाढेल, डेटा-आधारित निर्णय घेण्याचा आत्मविश्वास निर्माण होईल आणि करिअर तसेच व्यवसाय वृद्धीसाठी नवीन संधी उपलब्ध होतील.
एसआयआयएलसीच्या विविध प्रशिक्षण व कार्यशाळांची माहिती मिळवण्यासाठी व नावनोंदणीसाठी
संपर्क : ८४८४८११५४४, ८९५६३४४४७२, ८९५६३४४४७१, ९३५६९७३४२७.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

