गोल्डन नेस्ट उड्डाणपुलावरून वादाचा प्रयत्न

गोल्डन नेस्ट उड्डाणपुलावरून वादाचा प्रयत्न

Published on

गोल्डन नेस्ट उड्डाणपुलावरून वादाचा प्रयत्न
भाईंदर, ता. २७ (बातमीदार) : भाईंदर ते काशी मिरा या मुख्य मार्गावर मेट्रो मार्गाखाली तीन उड्डाणपूल बांधण्यात आले आहेत. त्यातील गोल्डन नेस्ट येथील उड्डाणपुलावरून नवा वाद उभा करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. त्याबद्दल गैरसमज पसरविण्याचे काम समाजमाध्यमांवर सुरू करण्यात आले आहे.
हा पूल गोल्डन नेस्ट चौकापर्यंत चार पदरी असून, पुढे तो दोन पदरी करण्यात आला आहे. यावरून मंगळवारी (ता. २७) समाजमाध्यमांवर गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा पूल आधी चार पदरी असताना नंतर तो अचानक दोन पदरी झाला, त्यात एमएमआरडीएच्या अभियंत्यांची गंभीर चूक झाली असल्याची चित्रफीत समाजमाध्यमांवर व्हायरल करण्यात आली. याची माहिती मिळताच एमएमआरडीएकडून त्याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. या उड्डाणपुलाचे गोल्डन नेस्टपर्यंत चार पदरी व पुढे दोन पदरी असेच नियोजन सुरुवातीपासून आहे. त्यात अभियांत्रिकी चूक वगैरे काहीही नाही. हा उड्डाणपूल भाईंदर पश्चिम भागात उतरविण्याचे नियोजन आहे. त्यामुळे दोन मार्गिकांची आतापासून तरतूद करून ठेवण्यात आली आहे, असे एमएमआरडीएने स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com