गिरणी कामगारांच्या घराच्या प्रश्नावर आवाज उठवणार - सचिन अहिर

गिरणी कामगारांच्या घराच्या प्रश्नावर आवाज उठवणार - सचिन अहिर

Published on

गिरणी कामगारांंच्या
घरांसाठी आवाज उठवणार
सचिन अहिर यांची ग्वाही
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : राज्य सरकार परदेशातून गुंतवणूक आणल्याचे म्हणत असले, तरी राज्यातील परिस्थिती भयावह आहे. येथील कारखाने, उद्योग बंद पडत आहेत. बेरोजगारीचा प्रश्न गंभीर आहे. मुंबईसह देशातील बंद गिरण्यांच्या प्रश्नाकडे केंद्र सरकार डोळेझाक करीत आहे. गिरणी कामगारांच्या घराचा प्रश्न प्रलंबित आहे. त्यामुळे त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी विधिमंडळात आवाज उठवणार असल्याची ग्वाही राष्ट्रीय मिल मजूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिन अहिर यांनी दिली. राष्ट्रीय मिल मजदूर संघात आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.
गिरणी कामगार घरांसाठी जाचक ठरणारे १७ वे कलम राज्य सरकारने रद्द केले. सुमारे १४ कामगार संघटनांच्या एकत्रित लढ्याचे हे यश आहे; परंतु सरकारने दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी करावी, यासाठी अधिवेशनामध्ये निश्चितपणे आवाज उठवला जाईल. तसेच लोकसभेत आवाज उठवण्यासाठी खासदारांना लवकरच निवेदन देण्यात येईल, असे अहिर यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी सरचिटणीस गोविंदराव मोहिते आणि सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com