उल्हासनगरमध्ये दुकानाला आग

उल्हासनगरमध्ये दुकानाला आग

Published on

उल्हासनगर, ता. २७ (वार्ताहर) : उल्हासनगर कॅम्प क्रमांक ४ आरजीएस शाळेजवळील भाजी मार्केट समोरील मनीष जनरल स्टोअरला लागलेल्या आगीत संपूर्ण दुकान जळून गेले. अरुंद रस्ते आणि अडथळ्यांमुळे मदतकार्यही वेळेवर पोहोचू शकले नसल्याने प्रशासनाच्या व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे बोलले जात आहे.
उल्हासनगर कॅम्प क्रमांक ४ येथील आरजीएस शाळेजवळील मनीष जनरल स्टोअरमध्ये रविवारी अचानक आग लागल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ दुकानमालक मनीष हिंदुजा यांना कळवले. त्यानंतर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मात्र, परिसरातील अरुंद रस्ते आणि रस्त्यावर उभ्या असलेल्या मोठ्या वाहनांमुळे घटनास्थळी पोहोचण्यात विलंब झाला. जवानांना मोठ्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. आगीत दुकानातील फर्निचर, फ्रीज, स्टेशनरीसह इतर सर्व साहित्य जळून गेले. प्राथमिक माहितीनुसार या दुर्घटनेत लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com