

पदपथ राखण्यासाठी मोहीम
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २७ : वाहनचालकांसह पादचाऱ्याच्या सुरक्षेसाठी ''रस्ता सुरक्षा हीच जीवन सुरक्षा'' हे अधोरेखित करताना शहरातील रस्त्यांबरोबरच पदपथ राखण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. पदपथ नागरीकांना चालण्यासाठी आहेत, ते अबाधित ठेवले पाहिजेत. त्यामुळे पादचाऱ्यांचे अपघात कमी होण्यास मदत होईल. या अनुषंगाने, महापालिका, पोलिस आणि जिल्हाधिकारी यांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
ठाणे शहर वाहतुक शाखेच्यावतीने रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या अनुषंगाने साकेत येथील पोलीस क्रिडासंकुल मैदानात प्रजासत्ताक दिनापासून २८ जानेवारीपर्यंत सुरू असलेल्या वाहतुक नियमांविषयी जनजागृतीपर विविध कार्यक्रमांच्या कार्निव्हलचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडले. या कार्निव्हलमध्ये विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या वाहतुकीच्या चित्ररूपी दिनदर्शिकेचे लोकार्पण करून उपमुख्यमंत्री शिंदे यांनी विद्यार्थ्याचे सत्कार केले. यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी कोंडीमुक्त ठाणे आणि सुरक्षित प्रवासावर भर दिला. दरवर्षी रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येते, त्याप्रमाणे प्रत्येकाने वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. वाहतूक नियमांची जनजागृती लहानग्यापासून केली जात आहे, याचा अभिमान वाटत असल्याचे गौरवोद्गार काढत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी कार्निव्हलच्या प्रदर्शनात मांडलेल्या ई दुचाकी तसेच, ई मोटारी चालवण्याचा अनुभव घेतला.
उन्नत मार्गाचे काम प्रगतीपथावर
ठाण्याची वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी घोडबंदर रोड पूर्ण खड्डेमुक्त करणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले. या सत्यावर अनेक ठिकाणी असलेले अनावश्यक कट आपण बंद केल्याने वाहतूक कोंडी कमी झाली. त्याचबरोबर कोस्टल रोड, उन्नत मार्गाचे कामही प्रगतीपथावर आहे, त्यामुळे लवकरच ठाणेकरांना कोंडी मुक्त प्रवास करण्याचा अनुभव येईल. अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणेकरांना दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.