जिवाची बाजी लावणाऱ्यांचा सन्मान

जिवाची बाजी लावणाऱ्यांचा सन्मान

Published on

जीवाची बाजी लावणाऱ्यांचा सन्मान
अग्निशमन, आपत्कालीन सेवा विभागासाठी पदक
विरार, ता. २८(बातमीदार)ः वसई-विरार शहर पालिका क्षेत्रात उद्भवणारी पूरस्थिती, दुर्घटना, आगीच्या घटनांमध्ये अग्निशमन, आपत्कालीन सेवा विभागातील अधिकारी, कर्मचारी जोखीम पत्करत असतात. अशा कर्मचाऱ्यांचा पालिका ‘आयुक्त गौरव पदक’ देऊन सन्मान करणार आहे.
महापालिका क्षेत्रात २०२५ मध्ये अतिवृष्टीच्या काळात पूरजन्य परिस्थितीत अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांनी विविध ठिकाणी बचावकार्य केले होते. पुराच्या पाण्यातून अनेक नागरिकांना सुखरूप बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी पोहोचविले, तर विरार पूर्वेतील रमाबाई अपार्टमेंटचा भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या वेळी अग्निशमन दलातील जवानांनी एनडीआरएफ टीमच्या मदतीने सलग ४१ तास रेस्क्यू ऑपरेशन राबवले होते. अशा असंख्य आपत्कालीन परिस्थितीत पालिका अग्निशमन, आपत्कालीन विभागाचे कर्मचारी अतुलनीय शौर्य, कुशलता दाखवतात. अशा कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यांना योग्य सन्मान मिळावा, त्यांचे मनोबल वाढावे यासाठी जीवाची बाजी लावून जनसेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रतिवर्षी उत्कृष्ट आपत्ती सेवा आयुक्त गौरव पदक देण्यात येणार आहे. आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार पालिकेने हा निर्णय घेतला आहे.
-------------------------------------
समिती स्थापन
गौरव पदक पुरस्काराची शिफारस करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमार्फत वर्षभरात अग्निशमन व आपत्कालीन सेवा विभागात उल्लेखनीय कामगिरी करणारे अधिकारी, कर्मचारी यांची नावे दिली जाणार आहेत. त्यांना महाराष्ट्र दिन, प्रजासत्ताक दिनी अथवा इतर विशेष कार्यक्रमांच्या वेळी सन्मानित केले जाणार आहे. या निर्णयामुळे अग्निशमन व आपत्कालीन विभागातील कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com