चेंबूरमध्ये संविधान सन्मान रॅली
चेंबूरमध्ये संविधान सन्मान रॅली
चेंबूर, ता. २८ (बातमीदार) : प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरके) पक्षाध्यक्ष राजाराम खरात यांच्या नेतृत्वाखाली संविधान सन्मान रॅली काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅलीला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर अशोक गजरमल यांच्या अध्यक्षतेखाली सभेचे आयोजन करण्यात आले होते. प्रा. योगेश साळवी, प्रा. अनिल भालेराव, सतीश देशमुख व प्रा.डॉ कृष्णा गायकवाड यांनी या वेळी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन स्वप्नील शिर्के (भाऊ) यांनी केले. या वेळी परिसरातील कार्यकर्ते व आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

