पेण सुहित जीवन ट्रस्टच्या तीन विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धांमध्ये निवड
पेणच्या तीन विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय स्पर्धेत निवड
पेण, ता. २७ (वार्ताहर) : येथील सुहित जीवन ट्रस्टच्या तीन विद्यार्थ्यांची राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धांमध्ये निवड झाली आहे. त्यांच्या या यशामुळे रायगड जिल्ह्याचे नाव उज्वल झाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
स्पेशल ओलंपिक भारतच्या वतीने नागपूर येथील रामटेकमध्ये राज्यस्तरीय ॲथलेटिक्स आंतरशालेय स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. या स्पर्धेत राज्यातील ३६ जिल्ह्यातील विविध संस्थांमधून एकूण ३२० विशेष खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. यामध्ये रायगड जिल्ह्याच्या पेण तालुक्यातील गतमंद मुलांची शाळा सुहित जीवन ट्रस्टमधील मनीष म्हात्रे याने उल्लेखनीय कामगिरी करत २०० मीटर धावणे स्पर्धेत सुवर्ण पदक पटकाविले. तर अर्जुन वारे याने रौप्य पदक पटकाविले. तसेच सिद्धीका पाटील हिने ५० मीटर धावणेमध्ये सुवर्ण पदक पटकाविले. या कामगिरीसाठी हरियाणा येथील राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धांसाठी तिघांची निवड झाली आहे. त्यांच्यावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. यावेळी सुहित जीवन ट्रस्टच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. सुरेखा पाटील यांनी तीनही विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

